

Police investigating a gruesome murder scene in Visakhapatnam where a woman’s dismembered body was found hidden in a refrigerator after a relationship dispute.
esakal
Visakhapatnam Crime : विशाखापट्टणममध्ये घडलेल्या एका थरारक घटनेने पुन्हा एकदा 'श्रद्धा वालकर हत्याकांडा'च्या आठवणी ताज्या केल्या आहेत. येथे, एका किरकोळ वादातून एका व्यक्तीने एका महिलेची निर्घृण हत्या केली. आरोपी तिथेच थांबला नाही; त्याने त्या महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि ते एका रेफ्रिजरेटरमध्ये (फ्रीजमध्ये) लपवून ठेवले. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. रवींद्र हा मूळचा आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील 'राजम' येथील रहिवासी असून, सध्या तो विशाखापट्टणममधील गाजुवाका येथे राहत होता. आरोपीचे मृत महिलेशी अनैतिक संबंध होते.