

Kartiki Ekadashi & Tulsi Vivah 2026 Horoscope
Sakal
Horoscope November 2026 : आज शनिवार असून कार्तिकी एकादशीचा पवित्र दिवस आहे. आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत असल्याने धार्मिकदृष्ट्या या दिवसाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंच्या पूजेसाठी हा दिवस शुभ मानला जातो. चातुर्मासाची सांगता झाल्यानंतर विवाह, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होतो.