५६ भोग,६०० आचारी,२४० चुली अन् १ लाख भाविकांचे जेवण; जाणून घ्या जगन्नाथाच्या भव्य स्वयंपाकघराची वैशिष्ट्ये!

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांना अर्पण केल्या जाणाऱ्या ५६ भोगांची संपूर्ण यादी पहा...
Jagannath Rath Yatra 2026:World’s Biggest Temple Kitchen!

Jagannath Rath Yatra 2026:World’s Biggest Temple Kitchen!

esakal 

Updated on

The 56 Bhog of Lord Jagannath: विश्वप्रसिद्ध भगवान जगन्नाथ यांची भव्य रथयात्रा उद्या, १६ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघणाऱ्या या यात्रेत भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि बंधू बलभद्र यांच्या रथयात्रेसोबतच मंदिरात दिल्या जाणाऱ्या 'महाप्रसादाला' अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मातील इतर मंदिरांमध्ये दिला जाणारा प्रसाद हा सामान्यतः 'प्रसाद' म्हणून ओळखला जातो, परंतु पुरी येथे त्याला 'महाप्रसादाचा' दर्जा आहे. या महाप्रसादामध्ये भगवान जगन्नाथांना तब्बल ५६ पदार्थांचा (छप्पन भोग) नैवेद्य दाखवला जातो. हा महाप्रसाद कोणत्याही जाती, धर्म किंवा सामाजिक भेदभावापलीकडे जाऊन सर्व भाविकांमध्ये समानतेने वाटला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार, हा महाप्रसाद माता लक्ष्मीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली तयार केला जातो, ज्यामुळे यात एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा आणि शुद्धता असते.

छप्पन भोग अर्पण करण्याची वेळ

दिवसभरात एकूण ६ टप्प्यांमध्ये हा ५६ भोगांचा नैवेद्य भगवान जगन्नाथांना समर्पित केला जातो-

  • गोपाळ वल्लभ भोग: सकाळी ८:३० वाजता

  • सकाळ धुप: सकाळी १०:०० वाजता

  • भोग मंडप भोग: सकाळी ११:०० वाजता

  • माध्यान्ह धुप: दुपारी १२:३० ते १:०० वाजता

  • संध्या धुप: संध्याकाळी ७:०० ते रात्री ८:०० वाजता

  • बडा शृंगार भोग: रात्री ११:०० वाजता

जगातील सर्वात मोठे मंदिर स्वयंपाकघर

जगन्नाथ मंदिराचे स्वयंपाकघर हे जगातील सर्वात मोठे मंदिर स्वयंपाकघर मानले जाते. या स्वयंपाकघरात दररोज तब्बल १ लाख भाविकांसाठी अन्न शिजवण्याची क्षमता आहे. शेकडो वर्षांची परंपरा जपत हा महाप्रसाद आजही केवळ मातीच्या भांड्यांमध्ये आणि लाकडाच्या चुलींवरच शिजवला जातो. सुमारे ६०० मुख्य आचारी आणि त्यांचे मदतनीस २४० पारंपारिक चुलींचा वापर करून हा पवित्र महाप्रसाद तयार करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com