
Adhik Maas Information In Marathi : यंदा १८ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान अधिकमास आला आहे हे आपल्याला माहित आहे. दर तीन वर्षांनी हा महिना येत असतो. असं म्हणतात की, अधिकमासात जे काही पुण्यकर्म कराल त्याचं अधिक फळ मिळतं. त्यामुळे हिंदू धर्मात आणि कॅलेंडरनुसार या महिन्याला महत्वही अधिक देण्यात आलं आहे.
अधिकमासा विषयी खगोलशास्त्र अभ्यासक, पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी आपल्या यूट्यूब पोस्टमध्ये सविस्तर सांगितलं आहे. त्यांनी या व्हिडीओमध्ये अधिकमासाचे महत्व, त्याची दिनगणना, या महिन्यात काय करावे, काय करू नये अशा सर्वांगाने महिती दिली आहे.
अधिकमासाला पुरुषोत्तम मास, धोंडा मास, मलमास, मलिममुलूचमास अशी अनेक नावे असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. सौर कॅलेंडर आणि चांद्र कॅलेंडर यातील कालगणनेला मॅच करण्यासाठी हा महिना येतो.
इंग्रजी कॅलेंडमध्ये फक्त १२ महिनेच असतात. त्यात असा अधिकमास कधी नसतो. मग हिंदू कॅलेंडरमध्येच का येतो असा महिना? याविषयी देशपांडे सांगतात. पृथ्वीला सुर्याभोवती फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. त्यावरून इंग्रजी कॅलेंडर बनवले गेले आहे. तर हिंदू कॅलेंडर हे चांद्र कॅलेंडर आहे. त्याचं वर्ष ३५४ दिवसांचं आहे. त्यामुळे इंग्रजी आणि हिंदू कॅलेंडरमध्ये दरवर्षी ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर २, अडीच वर्षांनी हा अधिक महिना येतो. अशी योजना केली नसती तर मुस्लिम कॅलेंडप्रमाणे सणवार दर वर्षी एक एक महिना अलिकडे सरकले असते.
काय करावे, काय करू नये?
अधिक महिन्यात निष्काम कर्म करावीत. इच्छा मनात ठेवून कर्म करू नये असं शास्त्र सांगते.
निष्काम कर्माचे फळ हे अनंत पटीने मिळते.
नित्यपूजा उदाहर्णार्थ संध्या वंदन, नीत्य देवपूजा, अग्निहोत्र हा करण्यावर काहीही बंधन नाही.
नव्या देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा चालत नाही. पण बराच काळ पूजा न झालेल्या देव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येते.
एखाद्या रोगी व्यक्तीला बरे होण्यासाठी करावयाचे अनुष्ठान याकाळात करता येते.
लग्न, मुंज, वास्तूशांत, गृहप्रवेश यासारखी मांगलिक कामे याकाळात करू नये.
बोअर घेणे, दीक्षा घेणे ही कर्मे करू नयेत. संन्यास घेता येत नाही.
कोणत्याही व्रताचा आरंभ आणि उद्यापन अधिकमासात करता येत नाही.
पहिल्यांदाच कुठल्या तीर्थस्थीनी जायचे असेल किंवा कुठले देवदर्शन आयुष्यात पहिल्यांदाच करणार असाल तर ते या काळात करता येत नाही.
तेरावा महिना कोणता?
आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक म्हणीला काही ना काही संदर्भ आहेत. तशीच एक म्हण आहे दुष्काळात तेरावा महिना. याचा अगदीच शब्दशा अर्थ नाही घेतला तरी दरवर्षाचे १२ महिने असतात आणि तेरावा महिना म्हणजे अधिकमास असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.