Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘या’ गोष्टींचे करा दान, पदरात पडेल भरपूर पुण्य.!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त काही गोष्टींचे दान करणे देखील शुभ मानले जाते.
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024esakal

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वपूर्ण मानला जातो. याच दिवशी भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते.

वैदिक दिनदर्शिकेनुसार, अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यंदा अक्षय्य तृतीया १० मे (शुक्रवारी) ला मोठ्या उत्साहात देशभरात साजरी केली जाईल. या दिवशी शुभ कार्याचा शुभारंभ केल्याने त्यामध्ये सफलता मिळते, असे मानले जाते. शिवाय, या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त काही गोष्टींचे दान करणे देखील शुभ आणि महत्वाचे मानले जाते. या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने घरात सूख-समृद्धी, ऐश्वर्य नांदते, असे मानले जाते. तसेच, दान करणाऱ्या व्यक्तीला पुण्य मिळते, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी?

Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

मातीपासून बनवलेला माठ

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुण्य प्राप्तीसाठी मातीपासून बनवलेल्या माठाचे दान करणे शुभ मानले जाते. हे दान ज्या व्यक्ती करणार आहे? किंवा करू इच्छित आहे त्या व्यक्तीने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. स्नान केल्यानंतर मातीपासून बनवलेल्या माठात पाणी भरावे आणि या माठाचे दान करावे. (pot made of clay)

फळे

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी फळांचे दान करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी फळांचे दान करण्याची अनोखी परंपरा देखील आहे. या दिवशी ब्राम्हणाला खरबूज, कलिंगड, आंबा,काकडी या हंगामी फळांचे दान करावे. या दिवशी फळांव्यतिरिक्त पिवळे वस्त्र दान करणे देखील शुभ मानले जाते. (fruits)

सोन

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी आवर्जून केली जाते. परंतु, या दिवशी सोन्याचे दान करण्याचेही विशेष असे महत्व आहे. या दिवशी सोन्याचे दान केल्याने अक्षय्य पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. शिवाय, या दिवशी मिळालेल्या पुण्याचा कधी ही क्षय होत नाही. (Gold)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com