

Ganpati Aarti Collection: गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, मंगलमूर्ती आणि सर्वांचा लाडका देव आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने आणि आरतीने करतो. गणेशोत्सवाच्या दिवसांत तर आरतींचा गजर संपूर्ण वातावरण मंगलमय करतो. असं म्हणतात आरती करताना आणि ती म्हणताना आपण अंतःकरणाने देवाच्या सर्वात जवळ असतो.
आरती म्हणताना होणारा गजर, टाळ-मृदूंग अन् घंटेचा नाद आणि भक्तांचा उत्साह या सगळ्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झाले असते.
पुढे तुम्हाला गणपतीच्या सगळ्या प्रमुख आरत्या दिल्या आहेत.