आरोग्य संगोपनासाठी ‘साथ चल’

‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्स केबल्सचा आषाढी वारीत उपक्रम
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal

पुणे : ‘काया ही पंढरी। आत्मा हा विठ्ठल।।’ या संत वचनातून आरोग्याचे महत्त्व विशद होते. हाच संदेश घेऊन आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रमांद्वारे ‘सकाळ माध्यम समूह’ व फिनोलेक्स केबल्स ‘आरोग्य वारी’ घेऊन येत आहे. कोरोनासारख्या महामारीला हरवत आपण नव्या जोमाने यंदाच्या आनंदवारीत सहभागी होत आहोत.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीने सर्व जग हैराण होते. त्या काळात पायी आषाढी वारीही होऊ शकली नाही. वारकऱ्यांना घरी राहूनच पांडुरंगाची आराधना व ‘मनवारी’ करावी लागली. आता संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्याने यंदा पायी वारी होत आहे. त्याला सरकारची परवानगी मिळाली आहे. मात्र, सद्यःस्थिती पाहता संसर्ग काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे निर्बंध नसले तरी वारकरी व भाविकांनी आपले आरोग्य सांभाळून वारीचा आत्मानंद घ्यायचा आहे.

आरोग्य संगोपनाचा जागर करायचा आहे. त्यासाठीच ‘वारी विठुरायाची आणि आरोग्य संगोपनाची’ ही संकल्पना घेऊन ‘साथ चल’ उपक्रम २२ जून रोजी पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी चौक, एचए कंपनी भुयारी मार्ग आणि २४ जून रोजी पुण्यातील पूलगेट येथील महात्मा गांधी बसस्थानक येथे राबविण्यात येणार आहे. यात सहभागी होऊन आरोग्य संगोपनाचा संकल्प करीत दोन पावले चालायचे आहे. आपल्यासह सर्वांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य वारीत सहभागी झालेल्या सर्वांना आरोग्य संगोपनाची शपथ दिली जाणार आहे.

आरोग्य वारी का?

  • वारीमध्ये सहभागी वैष्णवांसोबत दोन पावले चालण्याचा आनंद

  • ‘साथ चल’ उपक्रमाच्या निमित्ताने चालण्याचा व्यायाम

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जनजागृती

  • स्वतःसह समाजहितासाठी स्वच्छतेचा सामूहिक संदेश

कुठे व किती वाजता सहभागी व्हाल?

बुधवार (ता. २२ जून) : मोरवाडी चौक, फिनोलेक्‍स कंपनी प्रवेशद्वार ते एचए कॉलनी प्रवेशद्वार भुयारी मार्ग ः १.२ किमी. सकाळी : ६

शुक्रवार (ता. २४ जून) ः महात्मा गांधी बसस्थानक, पुलगेट, पुणे कॅम्प ः सकाळी : ६

इथे नोंदवा सहभाग

मोबाईल ः ८४८४९७३६०२

ई-मेल ः editor.pune@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com