Chaitra Navratri 2023 : महाअष्टमीला करा हे खास उपाय, आर्थिक अडचणी होतील दूर

चैत्र नवरात्रीत सप्तमी अन् अष्टमीला विशेष महत्व असते. या दिवशी पूजन केल्याने इच्छित फळ मिळते.
Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri 2023esakal

Astro Tips Chaitra Navratri 2023 : चैत्र नवरात्रोत्सव सुरू असून ३० मार्चला नवमी (रामनवमी) ला समापन आहे. नवरात्रोत्सवात अष्टमीला सर्वात खास मानलं जातं. त्यामुळे यावेळी काही उपाय केल्यास त्यांना अडचणींतून मार्ग सापडतो. यावेळी चैत्र नवरात्री अष्टमीला ग्रहांचा विशेष योगही तयार होत आहे महाअष्टमीला काही उपाय करून समस्यांवर मात करता येइल असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.

यावेळी अष्टमी बुधवारी असून विड्याच्या पानाचा तोडगा करू शकतात. हा बुधग्रहाचा वार आहे. ज्यांच्या पत्रिकेत बुधग्रह कमकुवत असेल त्यांनी या दिवशी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्येतून सुटका होईल.

स्कंद पुराणानुसार देवांनी समुद्र मंथनावेळी विड्याच्या पानाचा उपाय केला होता. यामुळेच पुजनात विड्याच्या पानाचं महत्व आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार शुभ कार्यापूर्वी पुजापाठात विड्याची पानाद्वारे देवांचं आव्हान केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार विड्याचं पान पवित्र मानलं जातं.

Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri : नवरात्रीनंतर या ३ राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर

महाअष्टमीला करा हे उपाय

  • चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा. यामुळे आर्थिक अडचण दूर होते. आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो.

  • देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा. यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते.

  • नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा. त्यानंतर रात्री पान उशाखाली ठेवून झोपा. सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवा. यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळतं.

  • वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत मंगळवारी किंवा शनिवारी पानाच्या पुढच्या बाजूला कुंकवाने जय श्रीराम लिहा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन हातावर ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com