
Astro Tips : दर बुधवारी करा बुध ग्रहाच्या या मंत्रांचा जप! कसलीच कमी भासणार नाही..
Astro Tips : ज्योतिषशास्त्रानुसार एकूण नऊ ग्रह आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक ग्रहाला समर्पित असतो. तसंच बुधवार हा बुध ग्रहाच्या उपासनेसाठी ओळखला जातो. या दिवशी गणपतीची आणि श्रीकृष्णाची पूजा करावी असं लोकं सांगतात.
हेही वाचा: Vastu Tips : शनिदोष सुरू झाला आहे? या रोपट्याने पडेल फरक!
बुध ग्रह तल्लख बुद्धी आणि एकाग्रता वाढवायला मदत करतो त्यामुळे जर एखाद्याच्या पत्रिकेत बुध असेल तर ती व्यक्ती तुलनेने जास्त प्रगती करते. बुधवारच्या दिवशी तुम्हीही बुध ग्रहाचे हे मंत्र वापरुन पूजा करू शकतात.
हेही वाचा: Yoga At Night : शांत झोपेसाठी रोज रात्री झोपण्याआधी करा फक्त हे आसन
बुध देवाची मंत्र
- बुध देवतेचा पौराणिक मंत्र: ओम प्रियंगुलिकाश्याम रूपेणप्रतिमं बुधम्।
- बुध देवाचा गायत्री मंत्र: ओम सौम्यरूपाय विद्महे वनेषय धीमहि तन्नौ सौम्य: प्रचोदयात्।
- बुध देवाचा वैदिक मंत्र: ओम उदबुद्ध्यस्वग्ने प्रति जागृति त्वमिष्टपुरते सा सृजेथामयं च अस्मिंत्सदस्थे अद्युत्तरस्मिन् विश्वेदेवा यज्ञमानश्च सिदत्।
- बुध देवाचा बीज मंत्र: ओम ब्रम् ब्रम् ब्रम् सह बुधाय नमः.
- बुध देवाचा उपासना मंत्र: ओम ऐन स्त्री श्री बुधाय नमः
हेही वाचा: Winter Health Care : हिवाळ्यात जास्त पाणी पिता? सावधान, ओढावू शकतो मृत्यू
बुध देवाच्या मंत्राचे फायदे:
- बुध देवाच्या मंत्रांचा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि वाणी शक्ती मजबूत होते.
- बुध देवाच्या मंत्रांचा जप केल्याने स्पॉट रिस्पॉन्स आणि तर्कशक्ती वाढते.
- बुध देवाच्या मंत्रांचा जप केल्याने आत्मविश्वास वाढतो. .
- बुध देवाच्या मंत्रांचा उच्चार केल्याने लेखन आणि गाण्याची कला फुलते.
- बुध देवाच्या मंत्रांचा जप केल्याने व्यावहारिक आणि व्यावसायिक ज्ञान वाढते.
- बुध देवाच्या मंत्रांचा जप केल्याने माणसामध्ये गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत होते.