Yoga At Night : शांत झोपेसाठी रोज रात्री झोपण्याआधी करा फक्त हे आसन

बालासन हे आसन खूप सोपं आणि खूप जास्त मदत करणार आसन
Yoga At Night
Yoga At Night esakal

Yoga At Night : बालासन हे आसन खूप सोपं आणि खूप जास्त मदत करणार आसन आहे. हे केल्याने खूप शांत झोप लागते.. शिवाय दिवसभराचा थकवा सुद्धा याने दूर होतो. दिवसभर ऑफिस, ट्रॅफिक यामुळे शरीर खूप दमत.. आणि शांत झोप लागत नाही. बालासन हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे बाळ. एक असं आसन ज्यात आपल्याला बाळासारखं बसावं लागतं. याची पोज खूप चांगली आहे.

Yoga At Night
Breakfast Recipes : रोज नाश्त्यात वेगळं काय बनवायचं? मग वाचा हटके डिशेसची रेसिपी फक्त एका क्लिकवर

बालासनाच्या स्टेप (Balasana's method)

सर्वात आधी वज्रासनात बसा

आता दोन्ही हात सरळ करून पुढे न्या आणि डोकं जमिनीकडे खाली शक्य असेल तेवढं न्या.

आपल्या हातांना सरळ ठेवा आणि पोटावरती जरा ताण येऊ द्या. सुरुवातीला 15 से 20 सेकेंड हे आसन ट्राय करा, हळूहळू वेळ वाढवा

Yoga At Night
Winter Health Care : हिवाळ्यात जास्त पाणी पिता? सावधान, ओढावू शकतो मृत्यू

बालासन करने के फायदे (Benefits of Balasan)

- या आसनाचा सराव करताना पाठीच्या कण्याला आराम मिळतो.

- बालासनामुळे शरीरातील स्नायूंना आराम मिळतो आणि पाठदुखी दूर होण्यास मदत होते.

- बालासन केल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये लवचिकता येते.

- पाठदुखी, खांदे, मान, पाठ आणि सांधेदुखी आणि स्नायू दुखणे यामध्ये खूप फायदेशीर आहे.

- बालासन केल्याने मन शांत होते आणि राग कमी होतो.

- मासिक पाळी दरम्यान महिलांना होणारा त्रास संपतो.

- बालासनच्या नियमित सरावाने मनातील तणाव दूर होऊन शांती मिळते.

Yoga At Night
Yoga Outfits Accessories : नवीन वर्षाचा योगाचा संकल्प पूर्ण करायला मदत करतील अशा योगा अॅक्सेसरीज

या गोष्टींची घ्या काळजी

1. पायात जर त्रास असेल तर हे आसन करू नका

2. जर तुम्ही प्रेगनेंट असाल तर हे आसन तुमच्यासाठी नाही.

3. जर तुम्हाला डायरियाचा त्रास असेल तर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com