Astro Tips : माहिती आहे का? मांजरला धनलक्ष्मी यंत्र का म्हणतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CAT

Astro Tips : माहिती आहे का? मांजरला धनलक्ष्मी यंत्र का म्हणतात

मांजर जर रस्ता ओलांडताना दिसली तर ते अशुभ असते.आपण ज्या कामाला चालललो आहे ते काम बिघडते, पण कधी विचार केला आहे का मांजर शुभही असू शकते, हो मांजर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवू शकते. मांजरीची नाळ लक्ष्मी यंत्राचे काम करते. मांजरीचे दर्शन आणि आगमन शुभ असते.

ज्योतिषशास्त्रात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी आणि कुबेराला संपत्तीची देवता म्हटले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातील आर्थीक संकटे दूर होतात. ज्योतिषशास्त्रात मांजरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते,दिपावलीला लक्ष्मीची पूजा करताना घरातील ज्येष्ठांना मांजर दिसली तर ते शुभ मानले जाते. मांजरीचे दर्शन होणे, मांजरीचे आगमन शुभ असते. त्याचबरोबर काही लोक याला अशुभही मानतात.

ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की मांजरीची नाळ लक्ष्मी यंत्राचे काम करते, जर त्याची काळजी घेतली तर तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. शास्त्रानुसार मांजरीची नाळ शोधणे फार कठीण असते.असं म्हणतात की एखाद्याचं नशीब खूप चांगलं असेल तर फक्त त्यालाच नाळ मिळते. ती नाळ कोणाच्या हातात पडली तर त्याचे नशीब उजळते अशी श्रद्धा आहे. जर तुम्हाला मांजरीची नाळ आढळली तर त्यावर हळद लावा असे केल्याने ते एक प्रकारचे लक्ष्मी यंत्र बनते.

लक्ष्मी यंत्र म्हणजे काय

लक्ष्मी यंत्र हे सर्वात पवित्र आणि शक्तिशाली साधन आहे, ज्याद्वारे तुमच्या जीवनात आनंद येतो, आर्थिक संकट कायमचे टळते आणि ऐश्वर्य ,वैभव प्राप्त होते. हे लक्ष्मी यंत्र संपत्तीचे प्रतीक आहे.