
Astro Tips : आर्थिक संकट दूर करायचयं? मग घराच्या दारावर लटकवा ही वस्तु
घरातील आर्थिक त्रास आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. घरामध्ये सुख-समृद्धीसाठी ज्योतिषशास्त्राचे नियम खूप प्रभावी मानले जातात. ज्योतिष शास्त्रामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींशी संबंधित उपाय देखील सांगण्यात आले आहेत, जे केल्यावर तुम्ही सर्वात मोठ्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती आणि आर्थिक संकटासाठी घोड्याची नाळ अत्यंत महत्त्वाची मानली जाती. सर्व प्रयत्न करूनही कर्जातून मुक्तता होत नसेल किंवा नोकरी व्यवसायात बरीच प्रगती होऊनही आर्थिक समस्या घरातच राहिल्यास यासाठी घोड्याची नाळ फायदेशीर मानली जाते. आर्थीक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी घोड्याच्या नाळेचा कसा उपयोग करावा हे जाणून घेऊया
घोड्याच्या नाळेचे उपाय आणि फायदे
लोक गेटवर घोड्याची नाल टांगतात. यामुळे प्रत्येक समस्येपासून मुक्तता मिळते आणि घरातील नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते.ज्या घरात नेहमी पैशाची कमतरता असते, त्या घराच्या दारावर घोड्याची नाळ लटकवावी. घोड्याची नाल काळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्यास पैशाची कमतरता दूर होते आणि तिजोरी कधीच रिकामी होत नाही.घोड्याची नाळ शनिदेवाच्या प्रकोपापासून रक्षण करते. ज्यांना शनिदेवाच्या साडेसातीमुळे त्रास होत असेल त्यांनी उजव्या हाताच्या मधल्या बोटात काळी घोड्याच्या नाळेची अंगठी घालावी.
घोड्याच्या नाळेचे महत्त्व
घोड्याची नाळ मजबूत लोखंडाची बनलेली असते. वास्तुमध्ये असे मानले जाते की घोड्याची नाल ज्या प्रकारे घोड्याच्या पायांचे रक्षण करते.त्याचप्रमाणे ती आपले व आपल्या घराचे रक्षण करते.तसेच आर्थिक संकट दूर करते.