Astro Tips: ५ रुपयांच्या नाण्यांचा हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

astro tips

Astro Tips: ५ रुपयांच्या नाण्यांचा हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो

ज्योतिष शास्त्रामध्ये धनलाभासाठी अनेक उपाय सांगितले आहे. यातलाच एक सरळ सोप्पा उपाय ५ रुपयांच्या नाण्याशी संबंधित आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते आणि पैशाच्या समस्या दूर होतात.

आपल्याकडे पैसा असावा .पैशाच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणती समस्या उद्भवू नये हे प्रत्येकाला वाटतं. आपण आपल्या परिवाराला खुश ठेवावं, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात ह्यासाठी लोकं खूप प्रयत्न करतात. पण त्यासगळ्यात अनेकदा पैशांची बचत करणे कठीण होऊन जाते. त्यामुळे कितीही श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत असलो तरी कधी कधी ते स्वप्नच राहील की काय अशी भीती मनात येते.देवी लक्ष्मीला धन आणि वैभवाची जननी म्हटल जातं. या उपायांनी आपण देवीची कृपा दृष्टी प्राप्त करू शकतो.

पूजेच्या स्थानाजवळ तांदूळ किंवा दुर्वाने भरलेला कलश स्थापित करा. या कलशात ५ रुपयांचे नाणे ठेवा आणि या कलशाची नियमित पूजा करा. त्यामुळे आर्थिक संकट दूर होऊन कर्जाचा बोजाही हळूहळू कमी होऊ लागतो.५ रुपयांच्या नाण्यावर तुमच्या नावाचे पहिले अक्षर शेंदुराने लिहा. यानंतर हे नाणे छतावर किंवा पाण्याच्या टाकीजवळ ठेवावे.

नाणे रात्रभर तिथेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी नाणे आणि लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीचे आवाहन करा, ते नाणे लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

५ रुपयांच्या नाण्याशी संबंधित हा सोपा आणि खात्रीशिर उपाय केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि व्यक्तीला कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही. या उपायांसोबतच कर्जबाजारी व्यक्तीचे ओझेही हळूहळू कमी होऊ लागते. ५ रुपयांच्या नाण्याचा हा उपाय करणेही प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने प्रत्येक व्यक्तीला पैशाच्या कमतरतेपासून आराम मिळून धनवान बनून आनंदी जीवन जगता येते.