Astro Tips for Students : परीक्षा तोंडावर आल्यात अन् अभ्यास होईना? मग 'हे' उपाय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips for Students

Astro Tips for Students : परीक्षा तोंडावर आल्यात अन् अभ्यास होईना? मग 'हे' उपाय करा

Astro Tips for Students : आपल्या मुलाच भविष्य उज्वल व्हाव आणि त्याला पेपरमध्ये चांगले मार्क पडावे असं प्रत्येका पालकाला वाटत असतं, त्यासाठी पेपर जवळ आले की आईबाबांच वेगळच टाइमटेबल सुरू होतं. पण या सगळ्यात खूप जास्त ओढाताण असते टी विद्यार्थ्यांची. थोडासा वेळ आणि खूप जास्त पोर्शन त्यात अभ्यासात मन लागतच असं नाही.

शिवाय परीक्षा जवळ यायला लागली की खूप अस्वस्थ व्हायला होतं अनेकदा तर परीक्षेची भीती वाटून घाबरायला होतं. अनेकदा मुलांच्या अभ्यासाच टेंशन त्यांच्या आईबाबांना असत. आताही अनेक १० वी १२ वीच्या मुलांच्या प्रिलिम्स, अनेकांच्या घटक चाचण्या, CA CS च्या परिक्षाही जवळ आल्या आहेत; अनेक स्पर्धा परीक्षा तर सुरूच असतात.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? माजी खासदाराने तडकाफडकी सोडला पक्ष

परीक्षे दरम्यान अभ्यासात मन लागण्यासाठीचे उपाय:

-अभ्यासात कोणतीही कमतरता रहायला नको; एकाग्रतता आणि एकपाठीपणा वाढावा यासाठी दररोज गणपतीची आराधना करा.

-जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला खूप प्रयत्न करूनही परीक्षेत यश मिळत नसेल तर तुम्ही त्याला रोज सकाळी सूर्याला लाल फुल आणि अक्षदा घालून पाण्याच अर्घ्य द्यायला सांगू शकतो.

-मन अभ्यासात एकाग्र राहण्यासाठी कापूर आणि तुरटी तुमच्या स्टडी रूम मध्ये ठेवा. याने नकारात्मक ऊर्जाही दूर होते.

हेही वाचा: Royal Enfield Electrik01 : रॉयल एनफिल्ड घेऊन येतेय इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या डिटेल्स

-परिश्रम करूनही परीक्षेत यश मिळत नसेल तर गुरुवारी एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन धार्मिक पुस्तकांचे दान करा.

- अभ्यासाच्या ठिकाणी किंवा टेबलाजवळ सरस्वती देवीचा फोटो लावून रोज त्याची पूजा करा.

- जवळ मोराची पिसे ठेवा जेणेकरून एकपाठी पणा वाढेल. ज्योतिषशास्त्रानुसार मोराच्या पिसामध्ये कोणत्याही ठिकाणची नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते. मोराच्या पिसांच्या प्रभावाने तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढेल.

-परीक्षेत अपेक्षित यश मिळवण्यासाठी परीक्षेसाठी घराबाहेर पडताना दही-साखर खाऊन बाहेर पडावे.

टॅग्स :educationAstrology