
Astro Tips: ज्योतिष शास्रानुसार या गोष्टी केल्यास तुमच्यावर सदैव लक्ष्मी प्रसन्न राहिलं...
Astro Tips For Wealth: प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, आपल्यावर सदैव लक्ष्मी प्रसन्न रहावी अशी इच्छा असते. त्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करून आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला सुखी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो.
परंतु बहुतेक वेळा कठोर परिश्रम करूनही अनेकांना त्याचे सकारात्मक परिणाम मिळत नाहीत आणि सतत समस्या येतात. या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते उपाय नेमके कोणते आहे त्याचीच माहिती आपण आजच्या लेखात पाहू या...
1) ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपर्यात नियमितपणे गंगाजल शिंपडल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा संपते. आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार आपोआप वाढतो.
2) ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये देव्हाऱ्यात नियमितपणे पूजा करून दिवा लावल्याने लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहते. तसेच रविवारी उंबराच्या झाडाची मुळं आणून त्याची विधिवत पूजा करून ती तिजोरीत किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवाल्यास घरात लक्ष्मी टिकून राहते.
हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारं मेथीच्या भाजीच्या पिठलं कस तयार करायचं?
3) धार्मिक मान्यतांनुसार, सकाळी उठून ब्रश करणे किंवा शरीराची इतर स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करावे. आंघोळ न करता धार्मिक ग्रंथ आणि मूर्तीला हात लावणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील लक्ष्मी कोपुन तुमच्या घरातील समृद्धीला उतरती कळा लागू शकते.
4) ज्योतिष शास्त्रानुसार दोन्ही वेळेचे भोजन करतांना जआपले तोंड पूर्वेकडे असावे. कारणपूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने जीवन आनंदी होते. आणखी एक गोष्ट म्हणजे पायात बुट किंवा चप्पल घालून कधीही जेवू नये.
हेही वाचा: Winter Recipe: हिवाळ्यात ओव्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?
5) ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात देवाला अर्पण केलेली फुले सुकवल्यानंतर ते आदरपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत. घराच्या आजूबाजूला पाणी असणारी जागा नसेल तर एखाद्या ठिकाणी खड्डा खणून तिथेही पुरून टाकली तरी चालतील.