Astro Tips : या सवयींमुळे लोक होतात श्रीमंत आणि राहतात निरोगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips : या सवयींमुळे लोक होतात श्रीमंत आणि राहतात निरोगी

पूणे : जीवनात अडचणी येतच असतात. कोणी त्यावर शांती करा, होम हवन करा हे उपाय सांगते. तर कोणी घरात वास्तूशास्त्रानुसार बदल करण्यास सांगते. यामुळे खरंच किती फायदा होतो हे एक कोडे असले तरी लोक त्याचा अवलंब करतात. संकटांच्या फेऱ्यात अडकल्यावर लोकांना काहीच कळेनासे होते. अशावेळी आपण दिसेल ते उपाय करतो.

हेही वाचा: Astro Tips: घरात घडणाऱ्या या घटना मानल्या जातात अशुभ, कारण...

अनेकांना खूप कष्ट करूनही पैसा कमवणे जमत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले जाते. अशा स्थितीत पैशाची कमतरता आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.

हेही वाचा: Astro Tips: घरात घडणाऱ्या या घटना मानल्या जातात अशुभ, कारण...

मोठे श्रीमंत लोक घरी नित्यनियमाने काही गोष्टी करतात. त्या गोष्टींचा परिणाम म्हणून त्यांच्याकडे पैसा आणि आरोग्य टिकून राहते. त्यामुळे काही सवयी स्वत:ला लावून तूम्हीही देवाला प्रसन्न करून धन, दौलत कमावू शकता. त्या कोणत्या सवयी आहेत हे पाहुयात.

हेही वाचा: Astro Tips : श्रीमंत व्हायचंय? 'या' सवयी पाळा, दिसेल काही दिवसातच फरक

सकाळी उठल्याबरोबर आई-वडील, शिक्षक आणि वडिलधाऱ्यांना नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. रोज गाईला गूळ आणि चपाती खायला घालावी. तिची पूजा करावी. यामुळे तूमच्या मनात असेलले इच्छित कार्य पूर्ण होईल.

टॅग्स :AstrologyAstrologist