Astro Tips : दिवसरात्र कष्ट करुनही स्वतःचे वाहन घेऊ शकत नाहीये; करा हे सोपे उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips : दिवसरात्र कष्ट करुनही स्वतःचे वाहन घेऊ शकत नाहीये; करा हे सोपे उपाय

Astro Tips : आपल्या स्वतःच्या मालकीचे चारचाकी वाहन असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्वतःचे चारचाकी वाहन असावे असे वाटत असते. स्वतःचे वाहन खरेदी करता यावे यासाठी लोक मोठे कष्ट करतात. मात्र अनेकदा या कष्ट अन् प्रयत्नांना यश येत नाही. वाहन खरेदीसाठी जमा केलेले पैसे इतर ठिकाणी खर्च होतात.

असे अनेकांच्या बाबतीत होते. तुम्हालाही असा अनुभव आला असेल मात्र त्यावर मात करुन स्वतःचे वाहन खरेदी करायचे असेल, म्हणजे मनातील इच्छा पुर्ण करायची असेल तर ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने थोड्याच दिवसात तुमच्या स्वतःच्या मालकीचे चारचाकी वाहन तुमच्या दारा उभे राहू शकेल असे ज्योतिष अभ्यासक पं. विजय जोशी गुरुजी सांगतात.

हेही वाचा: Astro Tips : देवतांचे पूजन करताना 'या' चुका करु नका; अन्यथा...

चला तर लवकरात लवकर आपले स्वतःचे वाहन खरेदी करता यावे यासाठीचे उपाय जाणून घेऊया.

* आपल्या घरात येणारे आपले वाहन म्हणजे आपली लक्ष्मी असते. त्यामुळे लक्ष्मी घरात यावी यासाठी आपल्या कुलस्वामिनीची मनोभावे आराधना करावी. कुलदेवीला सौभाग्यवायन अर्पण करावे.

* दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर चमेलीचे फूल अर्पण करा. सोमवारी गुंतवणूक करणे शुभ मानले जाते.

हेही वाचा: Daily Panchang: लाल वस्त्र परिधान करावे; दिवस लाभदायक असेल

* मंगळवारी देवीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

* दर शनिवारी हनुमान मंदिरात हनुमानाला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. यासह तांब्याच्या धातुने निर्मीत दिवा देवासमोर लावाव.

* दर शनिवारी शनी मंदिरात शनी देवाला मनातील इच्छा सांगून तेल अर्पण करावे.

हेही वाचा: Dev Puja Astro Tips : घरात देवपूजा करताना या 11 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; कधीही वादविवाद होणार नाहीत

वरील सर्व उपाय केल्याने आपण करत असलेल्या कष्टाचे फळ शिघ्र अति शिघ्र आपल्याला प्राप्त होईल. आपल्या मनामध्ये जी स्वतःचे वाहन घेण्याची इच्छा आहे ती लवकरात लवकर इश्वराच्या आशिर्वादाने पुर्ण होईल असे पं. विजय जोशी सांगतात.