Astro Tips : देवतांचे पूजन करताना 'या' चुका करु नका; अन्यथा...

Astro tips
Astro tipsesakal

Astro Tips : सनातन परंपरेमध्ये देवतांच्या उपासनेला विशेष महत्व आहे. मनातील इच्छापुर्ती, आयुष्यात येणाऱ्या समस्या दुर व्हाव्या यासाठी भाविक दैनंदिन दिनचर्येत देवतांची मोठ्या भक्तीने आराधना करतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या यथाशक्ती देवाचे पुजन करत असतो. कोणी मंदिरात जाऊन पुजा करतात तर कोणी घरातील देव्हाऱ्यात पुजन करुन प्रार्थना करतात.

अनेकदा काही गोष्टींचा ताण- तणाव, मन स्थिर नसते त्यामुळे पुजेवेळी मन एकाग्र नसते. यामुळे पुजा करताना आपल्या हातून कळत- नकळत काही बारिक सारीक चुका घडतात. मात्र या चुकांमुळे केलेल्या कर्माचे यथायोग्य फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे देवाची पुजा- आराधना करताना या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या.

Astro tips
Dev Puja Astro Tips : घरात देवपूजा करताना या 11 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; कधीही वादविवाद होणार नाहीत

* देवतांची पूजा करताना पंचायतन देवता म्हणजे गणेश, विष्णू, शिव, सूर्य आणि देवी यांचे पुजन महत्वपुर्ण आहे. या देवतांचे ध्यान अवश्य करावे. असे केल्याने सुख, समृद्धीची प्राप्ती होते.

* शिवमंदिरात 'झांज', सूर्यमंदिरात 'शंख' व देवीच्या मंदिरात 'बासरी' वाजवू नये.

* गायत्री किंवा नवार्णव मंत्र आसनावर बसूनच करावा. रस्त्याने जाता येता करू नये.

* आपली जपमाळ व आसन दुसऱ्याला वापरण्यास कधीही देऊ नये.

* द्वादशीला तुळस तोडू नये. महादेवाला बेल वाहताना बेलाचे पान नेहेमी पालथे ठेवावे.

Astro tips
Astro Tips : नोकरीत प्रगती हवी आहे? करा हे उपाय

* हनुमानाच्या फोटोशिवाय अन्य कोणत्याही देवदेवतांचे फोटो कधीही दक्षिणेकडे करू नये. (मृतव्यक्तींचे फोटो याला अपवाद आहे.)

* गंध उगाळून झाल्यानंतर ते तबकडीत काढूनच नंतर देवांना लावावे.

* गुरुचरित्र, दुर्गासप्तशती तथा धार्मिक ग्रंथांची पाने उलटताना, कधीही बोटाला थुंकी लावू नये.

* कांदा, लसूण. हे पदार्थ वापरलेले नैवेद्य, देवास दाखवू नये.

माहिती विवेचन - विजय राजेंद्र जोशी (ज्योतिष अभ्यासक, नाशिक)

Astro tips
देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com