Astro Tips : घरामध्ये तुळस का असावी? या दिशेला ठेवा तुळस, नेहमी फायदा होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips : घरामध्ये तुळस का असावी? या दिशेला ठेवा तुळस, नेहमी फायदा होईल

Astro Tips : घरामध्ये तुळस का असावी? या दिशेला ठेवा तुळस, नेहमी फायदा होईल

गावाकडच्या भागात आपल्याला आजही अंगणात मोठं तुळशी वृंदावन बघायला मिळेल. शहरातही अनेकांच्या घरात तुळस असते पण फ्लॅट सिस्टीम मुळे प्रत्येकालाच घराबाहेर तुळस लावता येतेच असं नाही, त्यामुळे अनेक लोकं आपल्या घरातच कुंडीत तुळशीचं रोप लावतात. पण घरात तुळस लावण्यामागेही आणि कुठे लावावी यामागेही एक शास्त्र आहे. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो, याला महत्त्व आहे.

हेही वाचा: Astro Tips : मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

भारतीय संस्कृती, परंपरेमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ असतं. यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं.

हेही वाचा: Astro Tips : यंदाच्या दिवाळीत माता लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत?; हे उपाय करा!

आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी. तुळशीला दररोज पाणी घालावं. ती सुकली असेल तर लगेचच काढून टाकावी आणि नवं रोपटं लावावं. सुकलेली तुळस घरात ठेवू नये, असं म्हणतात.

हेही वाचा: Astro Tips : जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत करा हे काम; अन्यथा भोगाव्या लागतील नरक यातना

कुठे लावावं तुळशीचं रोप

- घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचं झाड असावं. तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

- पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवावी. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये, असं म्हणतात.

- घराच्या छतावरही तुळस ठेवू नये, असं म्हटलं जातं. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं.

हेही वाचा: Astro Tips : शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम उपाय; अनेक समस्या होतील दूर, एकदा वाचाच

तुळशीचे फायदे

- तुळस घरामधले सगळे दोष दूर करते. तसंच तुळशीमुळे परिवाराचं आरोग्यही चांगलं राहतं.

- कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे.

- सर्दी-खोकला पळवण्यासाठीही तुळशीचा वापर केला जातो.

- कोरोना झाल्यावरही तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देण्यात आला.

- याचबरोबर तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचं स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.

Tags : Basil, Tulasi, Tulasi Vrundavan, Tulasi Importance, Vastu Tips, Astro Tips.