Astrology : दिवसाच्या पहिल्या प्रहरी जन्मलेली मुले कमावतात 'इतक्या' क्षेत्रात नाव

सकाळी जन्मलेल्या व्यक्तींची कही खास वैशिष्ट्ये असतात. ज्योतिषशास्त्रात सूर्योदयाच्या वेळेला दिवसाचा पहिला प्रहर म्हणतात.
Astrology
Astrologyesakal

Birth Time Predictions : ज्योतिषशास्त्रात व्याक्तीच्या जन्म वेळेला विशेष महत्व असते. त्यावरूनच मुलाचे भविष्य काय असेल ते ठरवले जाते. जन्माला आलेल्या सर्वांचे जीवन, व्यक्तिमत्व आणि भविष्य हे त्यांच्या जन्माच्या वेळेवरच बहुतांशी अवलंबून असतं. जन्मावेळीची रास, कोणता ग्रह, कोणते नक्षत्र होते, या सर्व गोष्टींसह ज्योतिषाचे जाणकार त्या व्यक्तीचे भविष्य आणि चारित्र्य याबद्दल बरीच अचूक माहिती देऊ शकतात. सूर्योदयाच्या वेळेला दिवसाचा पहिला प्रहर म्हणतात.

Astrology
Mole Astrology: शरीराच्या या भागावर तीळ असेल तर नशीब उजळते, संतती आणि संपत्तीची प्राप्ती होते

वेळेनुसार पाहिल्यास हा सकाळी ६ ते ९ या वेळेत मानला जातो. हिंदू धर्मात या प्रहरात पूजा आणि इतर शुभ कार्ये केली जातात. नक्षत्रांची स्थिती आणि ग्रहांचा प्रभाव पाहून कुंडलीही तयार केली जाते, ज्यावरून व्यक्तीच्या पूर्व काळ किंवा भविष्याचा अंदाज लावता येतो. सकाळी जन्मलेल्या व्यक्तीचे काय असतात वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

Astrology
Astrology: ‘या’ तीन राशींच्या लोकांना सहज मिळतं त्यांचं खरं प्रेम

पहिल्या प्रहरात जन्मलेले मुल

ज्योतिषशास्त्रात सूर्योदयाच्या वेळेला दिवसाचा पहिला प्रहर म्हणतात. वेळेनुसार पाहिल्यास हा सकाळी ६ ते ९ या वेळेत मानला जातो. या प्रहरात जन्मलेली व्यक्ती जीवनात नेहमीच प्रगती करत राहते, परंतु आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांची प्रकृती थोडीशी खराब राहते. पहिल्या प्रहरात जन्मलेले लोक लवकरच प्रकृतीच्या समस्येवर मात करून प्रगती करतात. या प्रहरात जन्माला आलेली मुले तीक्ष्ण बुद्धी आणि सत्यवादी असतात, म्हणूनच ते त्यांच्या जीवनात मोठे स्थान प्राप्त करतात.

Astrology
Nails Astrology: तुमच्या नखांचा आकार सांगतो तुमच्या आयुष्यातील शुभ अशुभ लक्षणे

दुसऱ्या प्रहरात म्हणजेच सकाळच्या उत्तरार्धात जन्मलेली मुले

वेळेच्या दृष्टीने सकाळचा दुसरा प्रहर ९ ते १२ वाजेपर्यंतचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या प्रहरात जन्मलेली मुले राजकारण आणि प्रशासकीय सेवांमध्ये चांगले भविष्य घडवतात. या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्वशक्ती असते. अशा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात इच्छित संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com