Mangal Transit: मंगळाच्या राशीपरिवर्तनाचा 'या' पाच राशींना होणार फायदा | Astrology | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mangal Transit

Mangal Transit: मंगळाच्या राशीपरिवर्तनाचा 'या' पाच राशींना होणार फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन मानवी जीवनावर परिणाम करत असते. राशी परिवर्तनामुळे मानवी जीवनावर सकारात्नक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम दिसून येतात. आज मंगळ राशी परिवर्तन करणार आहे. मंगळ ग्रह उर्जा, पराक्रम आणि धैर्याचा कारक मानला जातो. मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या..

हेही वाचा: Astrology: H अक्षरापासून नाव असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

मेष - मंगळावर मेष राशीचे राज्य असते. त्यामुळे मेष राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. मेष राशींच्या लोकांचे 16 ऑक्टोबरपासून चांगले दिवस येणार. कामाच्या ठिकाणी नफा मिळणार. कुटूंब आणि वैवाहीक जीवनात सुख समृद्धी येणार. हाती घेतलेले काम पुर्ण होणार आणि प्रत्येक कामात यश मिळणार.

मिथून - मिथून राशींच्या लोकांना मंगळ ग्रहांचे राशी परिवर्तन वरदान ठरणार आहे. मिथून राशीचे लोकांना १६ ऑक्टोबर पासून चांगले दिवस येणार. कामाच्या ठिकाणी नफा होणार सोबतच सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार. कुटूंबाचे सहकर्य लाभेल. हाती घेतलेले काम यशस्वी होणार. यंदाची दिवाळी ही आनंदाची आणि सुख समृद्धीचे असणार.

हेही वाचा: Astrology: H अक्षरापासून नाव असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

तुळ - तुळ राशीच्या लोकांना मंगळाचे राशी परिवर्तनाचा चांगलाच लाभ होणार. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार. कामाच्या ठिकाणी कौतुक होणार. एवढंच काय तर प्रमोशन होण्याची सुद्धा शक्यता आहे. ऐन दिवाळीत रखडलेले काम मार्गी लागणार. मनाप्रमाणे यश मिळेल. घरात सुख चैतन्य लाभणार.

वृश्चिक - मंगळावर वृश्चिक राशीचेही राज्य असते. त्यामुळे मंगळ ग्रहाची कृपा वृश्चिक राशीवरही दिसून येईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामात यश मिळणार. रखडलेले काम मार्गी लागणार. कुटूंबाचे सहकार्य मिळणार.

हेही वाचा: Astrology: J अक्षरापासून नाव असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

मीन - मीन राशीवर मंगळाची कृपा दिसून येईल. या राशीच्या लोकांची रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक अडचणी सुटतील. वैवाहीक आयुष्यात सुख समृद्धी लाभेल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळणार. हाती घेतलेले काम पुर्णत्वास न्याल. यंदाची दिवाळी सुख समृद्धी आणि भरभराटीची जाणार.