५० वर्षांनंतर आलाय अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष योग

चंद्र आपली उच्च रास वृषभ, शुक्र आपली उच्च रास मीन, शनी आपली स्वरास कुंभ आणि गुरू आपली स्वरास मीन यांमध्ये उपस्थित असतील.
akshay trutiya
akshay trutiyagoogle
Updated on

मुंबई : यावर्षी ३ मे यादिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. यावेळी विष्णू, लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा केली जाईल. हा दिवस नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा घरात समृद्धी आणेल अशी वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला मानला जातो.

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सकाळी ६ वाजून ५ मिनिटे ते दुपारी १२.३७ मिनिटे हा पूजेचा मुहूर्त आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षात तृतीय तिथीला विशेष मुहूर्त असतो. यालाच अक्षय तृतीया असे म्हणतात. यावर्षी अक्षय तृतीया मंगळवारी साजरी केली जाईल. या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि शोभन योगामुळे मंगल रोहिणी योग तयार होईल.

akshay trutiya
अक्षय तृतीया : पूजेचा मुहूर्त सकाळी ५.४० पासून १२.१७ पर्यंत; अत्यंत शुभ दिवस

या दिवशी चार राशी उच्च स्थितीला असतील. चंद्र आपली उच्च रास वृषभ, शुक्र आपली उच्च रास मीन, शनी आपली स्वरास कुंभ आणि गुरू आपली स्वरास मीन यांमध्ये उपस्थित असतील. असा योग ५० वर्षांनंतर दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी पंचांग न बघता केव्हाही शुभकार्य केले जाऊ शकते, असे मानले जाते. यादिवशी विवाह, गृहप्रवेश, कपडे आणि दागिन्यांची खरेदी, जमीन, वाहन, इत्यादी खरेदी केली जाते.

akshay trutiya
कोरोनाच्या सावटाखाली साजरी होणार अक्षय तृतीया

पुराणात अक्षय तृतीयेला अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यामुळे या दिवशी ज्वारी, गहू, चणे, दही, तांदूळ , फळे , इत्यादी दान केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com