Ayodhya Ram Mandir : थायलंडच्या ‘अयोध्ये’वरून आली माती अन् पाणी, शहरभर लागणार मोठमोठे स्क्रीन

बँकॉंकच्या विश्‍व हिंदू परिषदेच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी अयुथ्थया येथील हिंदू मंदिरात मोठमोठे स्क्रीन उभारले आहेत.
ayodhya ram mandir ceremony celebrated in thailand ayutthaya culture
ayodhya ram mandir ceremony celebrated in thailand ayutthaya cultureSakal

अयोध्या : अयोध्या आणि अयुथ्थया. एक भारतात, तर दुसरे थायलंडमध्ये. भौगोलिक सीमांनी वेगळे असणारे शहर केवळ नावाने सारखे नाही, तर या ठिकाणच्या भावनिक श्रद्धादेखील सारख्याच आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत असताना थायलंडमधील अयुथ्थयातही भक्त या उत्सवात सामील होण्याची तयारी करत आहेत.

अयोध्येच्या नावावरून थायलंडमध्ये अयुथ्थया असे नामकरण झालेल्या शहरातून अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टला माती, मंदिरासाठी चाओ फ्राया, लोप बुरी आणि पा सक या तीन नद्यांचे पाणी आले आहे.

चाओ फ्राया नदीच्या किनाऱ्यावर वसलेले अयुथ्थया हे प्राचीन शहर बँकाँकपासून ७० किलोमीटर उत्तरेकडे आहे. समृद्ध, सांस्कृतिक इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या ठिकाणाला जागतिक वारसाचा दर्जा युनेस्कोने दिला आहे.

बँकॉंकच्या विश्‍व हिंदू परिषदेच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी अयुथ्थया येथील हिंदू मंदिरात मोठमोठे स्क्रीन उभारले आहेत. मंदिरात दिवे लावण्यात येणार आहेत.

त्यादिवशी दिवसभर राम भजनाचे आयोजन करण्यात येणार आहे. रामायण देखील सादर केले जाणार आहे. मंदिरातून प्रसादाचे वितरण केले जाणार आहे. श्रीरामजन्म भूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, अयुथ्थया ही थायलंडमधील अयोध्या आहे.

अयुथ्थया शहराविषयी

थायलंडमधील सुमारे ६७४ वर्षांपूर्वीचे ठिकाण असलेल्या अयुथ्थया येथे मंदिर आणि अवशेष दिसतात. युनेस्कोने या शहराचा जागतिक वारसा स्थळात समावेश केला आहे. या प्राचीन शहराची स्थापना १३५० मध्ये रामथिबोडी (पहिले) यांनी केले.

चार शतकांपेक्षा अधिक काळ हे शहर सियामी साम्राज्याची दुसरी राजधानी राहिली. हे शहर चाओ फ्राया नदीकाठावर वसलेले आहे. या शहरात बौद्ध धर्म आणि हिंदू परंपरेचे मिश्रण पाहवयास मिळते. या जागेला अयोध्येवरुनच नाव देण्यात आले आहे.

१७६७ रोजी म्यानमारच्या (पूर्वीच्या बर्मा) सैनिकांनी या शहरावर हल्ला केला. त्यांनी जाळपोळ करत शहराची बरीच नासधूस केली. लोकांना तेथून जाण्यास प्रवृत्त केले. मात्र पुन्हा शहर वसले नाही. एकेकाळी हे शहर समुद्री व्यापार आणि सांस्कृतिक आदान प्रदानचे केंद्र होते. अयुथ्थया आता एक पुरातत्त्व अवशेष बनले आहे. या शहरात उंच प्रांग (रेलिक्वरी टॉवर) आणि बौद्ध मठाच्या खाणाखुणा दिसतात. यावरून भूतकाळातील शहराच्या आकाराचे आणि वास्तुकलेच्या वैभवाची कल्पना येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com