

Baba Vanga Prediction 2026
Sakal
Baba Vanga Prediction 2026: ऑक्टोबर महिन्याचा चौथा आठवडा काही राशींसाठी खास ठरणार असल्याचा दावा सध्या चर्चेत आहे. 19 ते 25 ऑक्टोबर 2026 या काळात वृषभ, मिथुन, सिंह, धनु आणि कुंभ या पाच राशींना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळू शकतात, असे व्हायरल भविष्यकथनात सांगितले जात आहे. मात्र, या भविष्यवाणीला बाबा वेंगा यांच्याशी जोडणारा ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे हे राशिभविष्य निश्चित भविष्य म्हणून न पाहता मनोरंजनाच्या दृष्टीने घ्यावे.