

Belpatra Rules: Days You Must Never Pluck Bel Leaves for Shiva Puja
esakal
Belpatra plucking rules: श्रावण हा पवित्र महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवलिंगावर पाणी अर्पण करून बेलपत्र वाहिल्याने महादेवाची असीम कृपा प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पण, अनेक लोक सोयीनुसार कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही वेळी बेलपत्र तोडतात. धार्मिक मान्यतेनुसार, चुकीच्या तिथीला किंवा अयोग्य वेळी बेलपत्र तोडल्यास पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही आणि नकळत दोषही लागू शकतो. त्यामुळे शंकराला प्रिय असलेले बेलपत्र तोडण्याचे आणि वाहण्याचे योग्य नियम काय आहेत, ते जाणून घेऊया.