
कृष्ण जन्माष्टमीला आपल्या राशीप्रमाणे तांदूळ, दूध, तूप किंवा वस्त्रांचे दान करा, ज्यामुळे ग्रह अनुकूल होतील.
राशीप्रमाणे दान केल्याने भगवान कृष्णाचे आशीर्वाद, मानसिक शांती आणि समृद्धी प्राप्त होते.
दान स्वच्छ मनाने, गरजूंना किंवा मंदिरात करा आणि दानानंतर कृष्ण मंत्राचा जप करा.
Rashi-wise charity for Janmashtami blessings: हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला होता. या दिवशी देशभरात त्यांची जयंती भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने साजरी केली जाते. मंदिरांमध्ये बाळ गोपाळाची मनोभावे पूजा केली जाते आणि भक्त दिवसभर उपवास करतात आणि मध्यरात्री श्रीकृष्णाचा अभिषेक आणि आरती करतात. जन्माष्टमीच्या दिवशी केलेले दान इतर दिवसांपेक्षा कितीतरी पटीने जास्त फलदायी असते असे शास्त्रांमध्ये म्हटले आहे. हा दिवस केवळ उपवास आणि पूजा करण्यासाठीच नाही तर सेवा आणि दानासाठी देखील आहे. असं मानलं जातं की जर व्यक्तीने या दिवशी आपल्या राशीनुसार विशेष वस्तू दान केल्या तर त्याला वर्षभर भगवान श्रीकृष्णाची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहते.