
how Mercury will affect money matters: कर्क राशीत बुध वक्री होणार आहे. कोणत्याही राशीत बुध वक्री असल्याने वेगवेगळ्या राशींवर अनेक प्रकारे परिणाम होतो. बुद्धिमत्ता आणि संवादाचा ग्रह बुध वक्री असल्याने आर्थिक आणि मालमत्तेच्या बाबतीत चढ-उतारांना सामोरे जावे लागते. वक्री बुध अनेक प्रकारच्या समस्या आणतो. यंदा १८ जुलै रोजी सकाळी १०.१२ वाजता बुध कर्क राशीत वक्री होईल आणि ११ ऑगस्ट रोजी थेट असेल. या काळात बुध वक्री असल्याने मिथून राशिसह पुढील राशींना आर्थिक समस्या येणार आहेत.