

why these mulank lead to officer dreams but often end in deep regret and repentance
esakal
अंकशास्त्राच्या (Numerology) विश्वात प्रत्येक अंकाची एक वेगळी ऊर्जा असते. काही लोक शांत आणि समाधानी जीवन जगणे पसंत करतात, तर काही लोकांच्या मनात लहानपणापासूनच लाल दिव्याची गाडी, हातात अमर्याद सत्ता आणि समाजात अधिकारी बनण्याचा तीव्र मोह असतो.
हा अधिकार मिळवण्यासाठी हे लोक आपल्या आयुष्यातील सुख, नाती आणि उमेदीचा काळ पणाला लावतात.
परंतु अंकशास्त्रात अशा तीन विशिष्ट मूलांकांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्या मनात हा मोह एका मर्यादेच्या पलीकडे जातो. जेव्हा वेळ निघून जाते आणि अपयश येते, तेव्हा याच मोहाचे रूपांतर एका मोठ्या पश्चातापात कसे होते ते आपण पुढे पाहूया.