Chaitra Navratri 2023 : आजपासून चैत्र नवरात्री, सुर्यास्तापर्यंत मुहूर्त, अशी करा घटस्थापना

घटस्थापनेचे ३ मुहूर्त संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, जाणून घ्या
Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri 2023esakal

Chaitra Navratri Ghatsthapana 2023 : आजपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात झाली आहे. दि. ३० मार्चपासून ही नवरात्री चालणार आहे. आज ६ मोठे शुभयोग आहे. ज्यात घटस्थापना होणार आहे. यासाठी दिवसभरात ३ मुहूर्त आहेत. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रुपात पूजा होते. नवीन खरेदीसाठीही हा प्रत्येकच दिवस शुभ असतो.

साधारण प्रत्येकच वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तित्रा नक्षत्र आणि वैधृती योग असतो. ज्यामुळे घट स्थापनेसाठी काही तासांचाच मुहूर्त निघतो. पण यंदा असं झालेलं नाही. त्यामुळे सुर्यास्तापर्यंत कोणत्याही मुहूर्तावर घट स्थापना करता येणार आहे.

शिवाय यंदा तिथींमध्ये कोणतीही गडबड नसल्याने देवी पूजेसाठी पूर्ण नऊ दिवस मिळणार आहेत. हा शुभ संयोग आहे. हे सलग दुसऱ्यावर्षी होत आहे. यामुळे दुर्गाष्टमी २९ मार्च बुधवारी असेल. दुर्गा महापूजा आणि श्रीराम नवमी ३० मार्च, गुरुवारी असणार आहे.

आज षड महायोगात नवरात्र सुरु होत आहे. शंख, हंस, शुक्ल, बुधादित्य, गजकेसरी आणि कुलदिपक नावाचे शुभ योग या काळात बनत असून हे समृद्धीचे प्रतिक आहेत. सुर्योदयाला सूर्यासोबत चंद्र, बुध आणि गुरु हे चार ग्रह एकाच राशी असतील. यापैकी तीन ग्रहांचे उत्तरा भाद्रपद नक्षत्रात असणं फारच शुभ कारक ठरणार आहे. षड महायोग आणि ग्रहांचा असा संयोग अनेक वर्षांतून बनतो.

Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीत ९ दिवसांत सुटलेले पोट अन् वजन होईल कमी, वाचा संपूर्ण डाएट प्लान

अशी करा घटस्थापना

  • गणेशाला नमस्कार करा.

  • मग जिथे घट स्थापन करायचा त्या जागोला नमस्कार करा.

  • तिथे पाट मांडा आणि त्यावर लाल कापड घालून पुन्हा नमस्कार करा.

  • कलशात शुद्धपाणी, गंगाजल, चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, हळकुंड, फूलं, दूर्वा, अक्षता, सुपारी आणि नाणं घाला.

  • आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवून झाका. आणि घट स्थापन करताना ओम नमश्चण्डिकायै हा मंत्र बोला.

Chaitra Navratri 2023
Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीच्या पहिले घरी आणा 'या' ५ गोष्टी होईल धनलाभ

नवरात्रीची पूजा

  • प्रत्येक दिवशी स्वतःवर गंगाजल शिंपडा, कपाळावर कुंकू लावा, देवापुढे दिवा लावा.

  • रोज पहिले गणेशाची मग देवीची पूजा करावी.

  • रोज देवी लक्ष्मी, सरस्वती, कालिकेची पूजा करावी.

  • ही पूजा करताना देवीला कुंकू, हळद, मेंदी, फूलं, अत्तर वाहून पूजा करावी.

  • पूजा संपल्यावर नैवेद्य दाखवावा, त्यानंतर आरती करावी. मग प्रसाद वाटावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com