Chanakya Niti : धनसंपत्ती वाढली अन् श्रीमंत झालात की या 5 चुका कधीच करू नका, व्हाल कंगाल...

त्यांनी समाज, राष्ट्र, राजनिती आणि सैन्य क्षमतेवर आधारित एक पुस्तक लिहीलं होतं ज्याचं नाव आहे निती शास्त्र.
Chanakya Niti
Chanakya Nitiesakal

Chanakya Niti : आचार्य चाणाक्यांचा जन्म इथून तब्बल ३ हजार वर्षांआधी झाला होता. ते भारताचे महान रणनितीकार, अर्थशास्त्री आणि चतुर व्यक्ती होते. त्यांनी समाज, राष्ट्र, राजनिती आणि सैन्य क्षमतेवर आधारित एक पुस्तक लिहीलं होतं ज्याचं नाव आहे निती शास्त्र.

यामध्ये आचार्य चाणक्य यांनी अशा अनेक अमूल्य गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या शेकडो वर्षांनंतर आजही त्यांच्या या निती मानल्या जातात. या पुस्तकात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसा मिळतो तेव्हा त्याने चुकूनही 5 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. असे न केल्यास त्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी.

धनवर्षाव झाल्यास कधी करू नये या चुका

अनेक वेळा पैसा आला की लोकांचा व्यर्थ दिखावा वाढू लागतो. अशी चूक तुम्ही कधीही करू नये. शो ऑफ करणारे लोक सहसा कोणालाच आवडत नाही आणि त्यांच्यापासून लोक अंतर ठेवू लागतात. त्याऐवजी, तो पैसा स्वतःच्या आणि इतर लोकांच्या भल्यासाठी वापरला पाहिजे. यामुळे देवता प्रसन्न होतात.

Chanakya Niti
Chanakya Niti

हुशारीने पैसे खर्च करा

आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा तो विचारपूर्वक खर्च केला पाहिजे. संकटकाळात पैसा हा सर्वात मोठा मित्र असतो. अशा परिस्थितीत जे पैसे सुरक्षितपणे ठेवत नाहीत, त्यांना वाईट काळात संकटाचा सामना करावा लागतो.

इतर लोकांसमोर चर्चा करू नका

चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा बाहेरील लोकांशी चर्चा करू नये. यावर चर्चा केल्याने चोर आणि शत्रू सक्रिय होतात आणि ते तुमचे नुकसान करू शकतात. त्यामुळे याबाबत मौन बाळगा आणि पैशाच्या सुरक्षिततेबाबत सावध राहा. (Lifestyle)

Chanakya Niti
Chanakya Niti : पैसे कमवताय पण अधिक धनलाभासाठी चाणक्याच्या 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या!

इतरांना त्रास देऊ नका

पैशाचा वापर इतरांना अपमानित करण्यासाठी किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मीची नाराजी सहन करावी लागते आणि घरामध्ये गरिबी येते. म्हणूनच पैशाचा उपयोग सकारात्मक पद्धतीनेच केला पाहिजे. (Chanakya Niti)

कधीही अहंकारी होऊ नका

आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैसा येतो तेव्हा त्याने कधीही गर्विष्ठ होऊ नये. संपत्तीचे प्रदर्शन केल्याने शत्रूंची संख्या वाढते आणि लोक त्यांच्यावर नाराज होऊ लागतात. त्यांचा हा अतिउत्साह कधी कधी त्यांच्यावर मात करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com