Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ? हे वाचाच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandra Grahan 2022

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ? हे वाचाच...

ग्रहण हा असा विषय आहे ज्याचे प्रत्येकाला कुतुहूल असते. खरं तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. अशात आज चंद्रग्रहण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का चंद्रग्रहणाविषयी बऱ्याच मान्यता आहे. त्यातली एक मान्यता म्हणजे चंद्रग्रहण पाहणे हे अशुभ असते. खरंच चंद्रग्रहण पाहणे शुभ आहे की अशुभ असा प्रश्न निर्माण होतो. आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. (Chandra Grahan 2022)

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, आणि या सावलीने चंद्राचा तेजस्वीपणा कमी होतो, तेव्हा चंद्राला ग्रहण लागले असे म्हणतात. हि खगोलीय घटना पौर्णिमेला घडत असते.

चंद्रग्रहणाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.

  1. खग्रास चंद्रग्रहण

  2. खंडग्रास चंद्रग्रहण

खग्रास चंद्रग्रहणात चंद्र हा पृथ्वीच्या सावलीत प्रछायेत पूर्णपणे झाकलेला असतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत एकत्र येतात तेव्हा यास खग्रास चंद्रग्रहण म्हणतात तर जेव्हा चंद्र हा अंशिकरीत्या पृथ्वीच्या सावलीने झाकल्या गेला असतो. तेव्हा त्यास खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.

आज खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे या वर्षाचे शेवटचे चंद्र ग्रहण आहे. कार्तिक शुक्ल पक्ष पौर्णिमेच्या तिथिला हे चंद्रग्रहण दिसणार. विशेष म्हणजे भारतात हे चंद्रग्रहण दिसणार आहे. त्यामुळे हे ग्रहण पाहण्याची प्रत्येकाला उत्सूकता असेल.

चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ?

  • चंद्र ग्रहण ही घटना वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशुभ नाही. मात्र धार्मिक मान्यतानुसार ग्रहण काळात घरातून बाहेर पडणे किंवा ग्रहण पाहणे अशुभ मानले जाते. कारण या वेळी प्रकृतिमध्ये काही वेळासाठी विचित्र शांति निर्माण होते जी मानवी आयुष्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते.

  • हे चंद्रग्रहण मेष राशिमध्ये होणार. या ग्रहणाच्या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही पिडीच परिस्थितीत असणार त्यामुळे या ग्रहणाचा विशेष प्रभाव हा मेष, वृषभ, सिंह, धनु और मीन राशीच्या लोकांवर होणार. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

  • वेधकाळात कोणत्याही प्रकारची शिवणकाम, विणकाम, जेवण तयार करणे, कापणे, खाणे, पिणे करू नये. जर कोणी महिला गर्भवती असेल तर त्यांनी ग्रहणाच्या नियमांचे विशेष पालन करणे गरजेचे आहे.

  • ग्रहण काळात पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणे तसेच दान करणे शुभ मानले जाते.

टॅग्स :moonLunar Eclipse