

Why You Should Hang a Copper Sun on Your Main Entrance, According to Vastu
esakal
Copper Sun on Your Main Entrance: घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी कायम राखण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांपैकी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याचा सूर्य लावणे. वास्तुशास्त्रात तांब्याला सूर्यदेवाचा धातू मानले गेले आहे. सूर्य हा जीवनशक्ती, तेज, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. मुख्य द्वारावर तांब्याचा सूर्य लावल्याने घरातील ऊर्जेचे संतुलन उत्तम राहते.