Horoscope 28 October: 'या' राशींसाठी पैशांची गुंतवणुक ठरेल शुभ, तुमची रास कोणती?

तुमच्या राशीनुसार तुमच्या भाग्यात आज काय आहे ते जाणून घ्या
Horoscope 28 October
Horoscope 28 Octoberesakal
Updated on

Rashi Bhavishya: आजचा दिवस म्हणजेच शुक्रवार काही राशींसाठी शुभ असून पैशांच्या गुंतवणुकीसाठी हा दिवस शुभ ठरेल. तुमच्या राशीनुसार तुमच्या भाग्यात आज काय आहे ते जाणून घ्या.

मेष - शुक्रवार म्हणजेच आजचा दिवस तुमच्या राशीसाठी फार परिणामकारक ठरेल. इतरांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. तुमच्या घरातील महिला किंवा तुम्ही नवीन कपडे किंवा इतर वस्तू खरेदी करू शकता. (Horoscope)

Horoscope 28 October
Rashi Bhavishya: 'या' पाच राशींना मिळणार आज मोठा धनलाभ

वृषभ - तुमची सकाळची सुरूवात आज खूप चांगली होईल. नशीब चांगलं असून तुम्ही सर्व कामं उत्तम कराल. नोकरदार लोकांना कोणतंही विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो.

मिथुन- या राशीतील काहींसाठी आर्थिक आणि व्यवसायिक प्रवास फायदेशीर ठरू शकतो. कौंटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत.

Horoscope 28 October
Astrology Horoscope : पाळीव प्राण्यांचा कुंडलीतील ग्रहांवर होतो मोठा परिणाम; हा प्राणी विशेष महत्वाचा

कर्क - तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल त्यामुळे तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.

सिंह - कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टींमुळे तुम्ही संपूर्ण वेळ कामात असाल. राहिलेली कामे किंवा प्रकल्प आता मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं.

कन्या - राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोकं अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही मिळण्याची शक्यता आहे.

तूळ - या शुक्रवारी तुमचं आरोग्य चांगले राहणार आहे. कामानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो. तुमचा दिवस पैशांच्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे. याशिवाय तुम्ही पॉलिसी आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता.

वृश्चिक - या शुक्रवारी तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य साधारणपणे चांगलं राहील. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. याशिवाय पैशाची गुंतवणूक शुभ राहील.

Horoscope 28 October
Rashi Bhavishya: 'या' पाच राशींना मिळणार आज मोठा धनलाभ

धनू - शुक्रवारी तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट कळण्याची शक्यता आहे. नशीब पूर्णपणे तुमच्यासोबत असणार आहे, त्यामुळे तुमच्या वेळेचा चांगला उपयोग करा. अचानक लाभाची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर काळजी घ्यावी.

Horoscope 28 October
Daily Love Rashifal: वैवाहिक अन् प्रेम जोडप्यांसाठी राशीनुसार आजचा दिवस कसा असणार, वाचा

मकर - शुक्रवारी कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता आहे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे खरे किंवा खोटे आरोप देखील लावले जाऊ शकतात. तसंच वादविवादापासून दूर राहणंच योग्य राहील. तरच तुमचं भाग्य चांगलं राहणार आहे.

Horoscope 28 October
Horoscope 27th October : आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल खास; जाणून घ्या तुमची रास

कुंभ - शुक्रवार तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न कराल. परिश्रमाचे अनुरूप लाभ न मिळाल्याने तुमची निराशा होऊ शकते.

मीन - या शुक्रवारी तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल होतील. तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करू शकता. याशिवाय तुमच्या नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com