Panchang 20 August 2022: आजच्या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in Marathisakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० ॲागस्ट २०२२ (daily panchang 20 august 2022 )

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २९ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२० वाजता तर सूर्यास्त १८:५६ वाजता होणार. आज चंद्रोदय २४:५९. वाजता होणार. आज प्रात: संध्या स.०५:११ ते स.०६:२० दरम्यान होणार तर सायं संध्या १८:५६ ते २०:०५ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:५४ ते १६:२५ दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:५६ ते २१:१३ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:१६ ते २५:०१ दरम्यान असणार. आज राहु काळ हा ०९:२९ ते ११:०४ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा १४:१२ ते १५:४६ दरम्यान असणार. आज श्राद्धतिथी ही  नवमी श्राद्ध असणार.

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी दुधी भोपळा खावू नये. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Panchang 19 August 2022: जन्माष्टमीला करा 'या' मंत्राचा 108 वेळा जप

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १४:१२ ते १५:४६

  • अमृत मुहूर्त - १५:४६ ते १७:२१

  • विजय मुहूर्त - १४:४४ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास २६:१५ प. राहू मुखात आहुती आहे. शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - नवमी(२६:१५ प.नं.दशमी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - रोहिणी(अहोरात्र)

  • योग - व्याघात(२४:५५ प.नं.हर्षण)

  • करण - तैतिल(१३:३६ प.नं. गरज)

  • चंद्र रास - वृषभ

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Third Shravan Somvar 2021: शिवामूठ तिसरा श्रावणी सोमवार

विशेष:- जन्माष्टमी पारणा, गोपाळकाला, शनि-पिंपळ-नृसिंह-मारूती पूजन, ‘सूर्योदयास रोहिणी नक्षत्र असताना कृष्णजन्म करणाऱ्या वैष्णवांचे कृष्णजन्म व्रत, सर्वार्थामृतसिद्धियोग(अहोरात्र)

या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे. ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. शनिदेवास खजुराचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com