पंचाग 20 जुलै : हिरवे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३१ ते दु.१२:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in Marathigoogle

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २० जुलै २०२२ (daily panchang 20 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २९ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१० तर सूर्यास्त १९:१० होणार. चंद्रोदय २४:२२ असणार तर प्रात: संध्या स.०५:०४ ते स.०६:१०च्या दरम्यान असणार. सायं संध्या -  १९:१० ते २०:१६ दरम्यान तर अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३५ दरम्यान असणार. याशिवाय आजचा प्रदोषकाळ १९:१० ते २१:२२ दरम्यान असणार. निशीथ काळ २४:१९ ते २५:०२ दरम्यान असणार तर राहू काळ हा १२:४१ ते १४:१८ च्या मध्ये असणार.

आजचा यमघंट काळ हा ०७:४९ ते ०९:२६च्या दरम्यान असणार. आजची श्राद्धतिथी अष्टमी श्राद्ध आहे त्यामुळे सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. विशेष म्हणजे कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३१ ते दु.१२:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी आवळा खावू नये.

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aashadh Dip Amavasya 2022 : दीप अमावस्या कधी आहे ?

लाभदायक

आजचा लाभ मुहूर्त १७:३३ ते १९:१० दरम्यान आहे तर अमृत मुहूर्त ०७:४९ ते ०९:२६💰 असणार. या शिवाय विजय मुहूर्त १४:५१ ते १५:४३ दरम्यान असणार

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर असणार. आज गुरू मुखात आहुती आहे. शिववास १२:१२ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी दु.१२:१२ नं.अनुकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - सप्तमी(१२:१२ प.नं.अष्टमी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - रेवती(१७:५४ प.नं.अश्विनी)

  • योग - सुकर्मा(१८:१५ प.नं.धृति)

  • करण - बव(१२:१२ प.नं. बालव)

  • चंद्र रास - मीन (१७:५४ नं.मेष)

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Astro Tips for Money : हे उपाय केल्याने घरात येईल पैसाच पैसा

विशेष:- कालाष्टमी, सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश २३:१७; मंडूक वाहन,वात नाडी अधिपती सूर्य-खंडवृष्टियोग, पंचक नक्षत्र समाप्ती १७:५४, उत्पात योग १७:५४ प.

या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे. नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे, ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा, नारायणास पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा, सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

याशिवाय दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Shravan 2022 : देवाच्या पूजेत फुल का महत्त्वाची असतात,जाणून घ्या कोणत्या देवाला कोणते फुल आवडते...

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशिंना सायं.०५:५४ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com