Panchang 21 August 2022: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे |Daily Panchang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

Panchang 21 August 2022: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २१ ॲागस्ट २०२२ (daily panchang 21 aug 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ३० शके १९४४

आज सूर्योदय ०६:२० वाजता होणार तर सूर्यास्त १८:५५ वाजता होणार. आज चंद्रोदय २५:४६ वाजता होणार तर प्रात: संध्या ही स.०५:११ ते स.०६:२० दरम्यान होणार. आज सायं संध्या ही  १८:५५ ते २०:०४ वाजता होणार तर आज अपराण्हकाळ हा १३:५४ ते १६:२५ दरम्यानचा आहे.

आज प्रदोषकाळ हा १८:५५ ते २१:१२ वाजता होणार तर निशीथ काळ हा २४:१५ ते २५:०१ वाजता होणार. आज राहु काळ हा १७:२० ते १८:५४ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा १२:३८ ते १४:१२ वाजता होणार. आज श्राद्धतिथी ही दशमी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी दु.०३:०५ प.शुभ दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१३ ते दु.०२:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी पडवळ खावू नये.या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: Panchang 20 August 2022: आजच्या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - ०९:२९ ते ११:०४

  • अमृत मुहूर्त - ११:०४ ते १२:३८

  • विजय मुहूर्त - १४:४४ ते १५:३४

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर. राहू मुखात आहुती आहे. शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - दशमी(२७:५५ प.नं.एकादशी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - रोहिणी(०६:४४ प.नं.मृग)

  • योग - हर्षण(२५:१५ प.नं.वज्र)

  • करण - वणिज(१५:०५ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - वृषभ (१९:५३ नं.मिथुन)

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: Shravan 2022 : तिसऱ्या सोमवारी MSRTCला साडेअठ्ठावन लाखांची लॉटरी

विशेष:- भद्रा १५:०५ ते २७:५५, गभस्तीसूर्याचे मौनपूर्वक पूजन, श्रीकृष्ण सरस्वती पु.ति(कोल्हापूर), ज़रथुष्ट्र जन्मदिन.

या दिवशी पाण्यात केशर चूर्ण टाकून स्नान करावे त्रैलोक्य मंगल सूर्यकवच स्तोत्राचे पठण करावे. ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.सूर्यदेवास गव्हाच्या दलिया खिरीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना सायं.०७:५३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Web Title: Daily Panchang 21 Aug 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang