Panchang 9 Nov: आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाणार | Daily Panchnag | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

Panchang 9 Nov: आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाणार

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १८ शके १९४४

आज सूर्योदय ०६:४२ वाजता होणार तर सूर्यास्त १७:५५ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १८:३८ आहे तर प्रात: संध्या ही स.०५:२६ ते स.०६:४२ दरम्यान होणार. आज सायं संध्या ही  १७:५५ ते १९:१३ दरम्यान होणार तर अपराण्हकाळ हा १३:२६ ते १५:४१ दरम्यान होणार.

आज प्रदोषकाळ हा १७:५५ ते २०:२८ दरम्यान होणार. आज निशीथ काळ हा २३:५३ ते २४:४४ दरम्यान होणार. आज राहु काळ हा १२:१८ ते १३:४२ दरम्यान होणार तर यमघंट काळ हा ०८:०६ ते ०९:३० दरम्यान होणार तर आज श्राद्धतिथी ही  प्रतिपदा श्राद्ध आहे.

ग्रहण करिदिन सर्व कामांसाठी वर्ज्य दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:११ ते दु.१२:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी कोहळा खावू नये.या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे. (daily panchang 9 November 2022)

हेही वाचा: Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ? हे वाचाच...

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १६:३१ ते १७:५५

  • अमृत मुहूर्त - ०८:०६ ते ०९:३०

  • विजय मुहूर्त - १४:११ ते १४:५६

पृथ्वीवर अग्निवास नाही. चंद्र मुखात आहुती आहे. शिववास १६:१३ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १६:१३ प. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - कार्तिक

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - प्रतिपदा(१६:१३ नं.द्वितीया)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - कृत्तिका(२७:०० प.नं. रोहिणी)

  • योग - वरियान(२२:९८ प.नं.परिघ)

  • करण - कौलव(१६:१३ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - मेष (०८:०१ नं.वृषभ)

  • सूर्य रास - तुळ

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: Chandra Grahan 2022: ग्रहणाच्या काळात करा 'या' मंत्रांचा जप

विशेष:- ग्रहण करिदिन सर्व शुभ कामांसाठी वर्ज्य दिवस आहे, पद्मक योग २७:०० प.(पुष्करतीर्थावर अतिशय पुण्यदायक), इष्टि, सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

हेही वाचा: Chandra Grahan 2022: ग्रहणाच्या काळात करा 'या' मंत्रांचा जप

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

टॅग्स :SanskrutiPanchang