esakal | माहूरला देवीच्या दर्शनासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर | Mahur Gad Renuka Devi
sakal

बोलून बातमी शोधा

माहूर (जि.नांदेड) : रेणुका देवी

माहूरला देवीच्या दर्शनासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थनास्थळे गुरूवारपासून (ता. सात) अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूर (जि. नांदेड) (Mahur Gad) येथील नवरात्र उत्सवाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Nanded District Collector Vipin Itankar) यांनी माहूर येथे मंगळवारी (ता. पाच) भेट देवून आढावा घेतला. विश्वस्तांसमवेत झालेल्या बैठकीत भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन प्रवेश पत्रिका (Nanded) घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. ही प्रवेशिका https://shrirenukadevi.in/ या संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या भाविकांना ऑनलाइन प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही, त्यांच्यासाठी माहूर टी - पाईंट येथे ऑफलाइन पासेसची सोय उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली. नवरात्र (Navratra Ustav) काळामध्ये भाविकांच्या सोयीसाठी पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत रेणुकादेवी मंदिर खुले राहील.

हेही वाचा: वैजापूर तालुक्यात एसटी-दुचाकीचा भीषण अपघात, तिघे ठार

दर्शनासाठी पास असल्याशिवाय प्रवेश नाही. तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. परराज्यातील भाविकांनी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र अथवा ७२ तासांमधील आरटीपीसीआर अथवा २४ तासामधील रॅपिड अँटिजेन टेस्ट असणे आवश्यक आहे. ६५ वर्षांवरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व दहा वर्षांखालील मुले यांनी नवरात्र काळामध्ये दर्शनासाठी गडावर येऊ नये. त्याऐवजी रेणूका देवी संस्थानच्या वेबसाइटवरुन ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. भाविकांना माहूर येथून रेणूका माता मंदिराकडे घेऊन जाणे आणि आणण्यासाठी एसटी बसची सोय केली आहे.

loading image
go to top