Datta Jayanti 2023 : दत्तगुरूंचा प्रसाद असलेला सुंठवडा खाण्याचे अनेक फायदे,जाणून घ्या कसा बनवायचा

भारतीय संस्कृतीत अनेक देव अन् संत महात्म्यांच्या जयंतीला सुंठवडा वाटला जातो
Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2023 esakal

Datta Jayanti 2022 : आज सगळीकडे मोठ्या उत्साहात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. प्रत्येक सणासाठीचा प्रसाद नैवेद्य हा त्या त्या ऋतूनुसार तयार केला जातो. दत्त जयंतीचा उत्सवात सुंठवड्याचा नैवैद्य दाखवला जातो. आज आम्ही दत्त जयंतीला दिल्या जाणाऱ्या सुंठवड्याचे आरोग्यदायी फायदे आणि तो कसा तयार करायचा याबाबत माहिती सांगणार आहोत.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2022 : दत्त महाराजांच्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तूम्ही पाहिल्यात का?

पावसाळ्याप्रमाणेच हिवाळा हा ऋतूदेखील आजारपणांना आमंत्रण देणारा असतो. या ऋतूत सर्दी, खोकला, ताप, जुलाब अशा अनेक आरोग्यसमस्यांना तोंड द्यावे लागते. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सुंठ असतेच. त्यात ‘सुंठीवाचून खोकला गेला’ अशी मराठी म्हण प्रचलित आहे. सुंठामुळे अनेक आजारपणं दूर राहू शकतात.

सुंठाचे आरोग्यदायी फायदे

सुंठ पावडरच्या सेवनामुळे हिवाळ्यातील अनेक आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. याच्या सेवनामुळे पचनसंसंस्था सुधारण्यास मदत होते.

Datta Jayanti 2023
Datta Jayanti Upvas Thali : दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त बनवा खास उपवसाची हटके थाळी
  1. सुंठामध्ये सर्दी, खोकला दूर करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास चहामध्ये आलं किंवा सुंठ पावडर टाकून चहा प्यावा.

  2. यामुळे सर्दी, खोकला, घशातील खवखव कमी होण्यास मदत होते.

  3. ताप अथवा डोकेदुखीवर सुंठ पावडरीचा लेप डोक्यावर लावला जातो. यामुळे ताप लवकर उतरण्यास मदत होते.

  4. याशिवाय ज्या लोकांना डायबेटिसची समस्या आहे. अशा व्यक्तींनी आहारात सुंठाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो.

  5. रक्तातील शुगर नियंत्रणात आणण्यासाठी कोमट पाणी, सुंठ आणि सैंधव घेण्याचा सल्ला दिला जातो.

  6. यामुळे पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते.

  7. जेवणाआधी कोमट पाण्यासोबत सुंठ खाल्याने पोट स्वच्छ होऊन पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.

Datta Jayanti 2023
Datta Jayanti : दत्त जयंतीला पुजा केल्याने मिळते पितृ-दोषांपासून मुक्ती, जाणून घ्या पूजा विधी अन् मंत्र

कसा बनवाला जातो सुंठवड्याचा नैवैद्य

साहीत्य - सुंठवड्यासाठी 200 ग्रॅम खोबरं,100 ग्रॅम खारीक, 25-25 ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, मनुका, एक चमचा सुंठ पावडर किंवा तुकडा, एक चमचा बडीशेप, एक चमचा ओवा, दोन चमचे धने, एक चमचा तीळ, थोडीशी मिरी, 100 ग्रॅम साखर घ्यावी.

कृती - हे सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्यावे. त्यानंतर ते गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा किस, काजू, बदाम आणि सुंठ पावडर टाकून पुन्हा मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करुन घ्यावे. अशापद्धतीने घरच्या घरी तुम्ही आरोग्यदायी सुंठवडा तयार करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com