
उद्या श्री दत्त जयंती साजरी होणार आहे. दत्त भक्तांसाठी ही मोठी पर्वणीच आहे. श्री दत्त महाराजांनी या भुतलावर अनेक काळ वास्तव्य केले आहे. कधी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपात तर कधी अक्कलकोटचे स्वामी,पैजारवाडीचे चिलेदेव यांच्या रूपात. त्यामुळे, दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्सवाह साजरा होतो.
दत्त जन्मकाळ सोहळ्याचे नियोजन अनेक दिवसांपासून सुरू असते. या काळात दत्त नवरात्रीही साजरी केली जाते. तसेच, सात दिवसाचे दत्त चरित्र पारायणही मंदिरांमध्ये होते. दत्तगुरूंचा महिमा जसा महाराष्ट्रात आहे तसा तो आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यातही पसरलेला आहे. त्यामुळे या राज्यातही श्री दत्त महाराजांची काही मंदिरे दिसून येतात.