मार्गशिर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. इंग्रजी महिन्याच्या शेवटचा महिना डिसेंबरमधील हा मोठा सण आहे. दत्त जयंतीची अनेक भक्त वाट पाहत असतात. कारण, दत्त सांप्रदायाचा मार्ग स्विकारणारे अनेक भक्त आहेत.
दत्त जयंतीदिवशी प्रत्येक मंदिर आणि मठ सजवला जातो. दत्त जयंतीच्या सात दिवस आधीपासून श्री दत्त पारायण केले जाते. या दिवशी सायंकाळच्या वेळी दत्त जन्मकाळ साजरा केला जातो. या वर्षी दत्त जयंती कधी आहे, त्याचे महत्त्व काय आहे जाणून घेऊयात.