देवणी : तालुक्यासह सीमावर्ती भागात शेतीसह शेतकऱ्यांच्या जीवनात विषेश महत्त्व असलेली दर्शवेळा अमावास्या सणानिमित्त शेतशिवार सोमवारी शेतकरी, ग्रामस्थांसह लहान मुलांनी फुलून जाणार आहे. यानिमित्त शेतशिवारात दर्शवेळा अमावास्येचा उत्साह दिसून येत आहे..सीमावर्ती भागात रब्बी हंगामात साजरा होणारा अन् शेतशिवारात सर्वाधिक महत्त्व असलेला सण दर्शवेळा अमावास्या. कर्नाटकात सर्वाधिक महत्त्वाचा असलेला हा सण तालुका सीमेवर असल्याने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रातही चांगलाच लोकप्रिय झाला आहे..पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. या दिवशी काळ्या मातीची लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते. गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात. तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवितात आणि वनभोजनाचा आस्वाद घेतात. दर्शवेळा अमावास्येला बोली भाषेत येळवस असेही म्हटले जाते. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो; तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफुल आदी पिकांमध्ये चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी देवीकडे प्रार्थना केली जाते..दर्शवेळा अमावास्येचा मेनूहिवाळा उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू. या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते; तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडे आणि रुक्ष पडू नये, यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळे या दिवसांत दूध, तूप, दही, लोणी यांचा आहारात समावेश करावा..यामुळे दर्शवेळा अमावास्येला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थांची घरोघरी मेजवानी असते. दर्शवेळा अमावास्येला डाळीच्या पिठात विविध भाजीपाल्यांची मिसळ करून तयार केलेली भजी हा मानाचा पदार्थ असतो. भजीसाठी हिरवा वटाणा, हरभरा, वरण्याच्या शेंगा, तूर, काकडी किंवा वाळूक, वांगी, मेथीचा पाला, कोथिंबीर, कांदापात, लसूण, अद्रक शेंगदाणे, हिरवी चिंच व गाजराचा वापर केला जातो. शिवाय ज्वारी भरड्याचा आंबट भात, तांदळाची खीर, भात, ज्वारी अन् बाजरीचे उंडे, भाकरी, तुरीचे वरण याशिवाय बरेच जण धपाटे, तिळाच्या पोळ्याही करतात..गाव अन् शहरात अघोषित संचारबंदीदर्शवेळा अमावास्येच्या दिवशी सकाळी गावातील सर्वच ग्रामस्थ शेतीच्या दिशेने निघाल्याने गावे ओस पडू लागतात, तर शेतशिवार गर्दीने फुलून जाते. यादिवशी दिवसभर गावागावांत शुकशुकाटच असतो. अपवाद वगळता गावात कोणीच राहात नाही. याउलट शेतीत झोका खेळणे, चिंच, बोर, वाटाण्याच्या शेंगा, ऊस यांसह सर्वच रानमेव्याचा आस्वाद घेत आबालवृद्ध दिवसभर शेतीतच रमतात. बच्चे कंपनी पतंग अन् झोक्याचा आनंद घेत दिवस उत्साहात घालवितात..रानमहोत्सवाची साऱ्यांना ओढरब्बी हंगामातील हिरवीगार पिके, फुलोऱ्यात आलेला हरभरा अन् बडी ज्वारी, शिवाय काढणीला आलेली तूर असे चित्र सध्या शेतशिवारात पहावयास मिळत आहे. मोहराने लगडलेला आंबा, त्याचा सर्वत्र पसरलेला मोहक सुगंध अशा रम्य वातावरणात दर्शवेळा अमावास्येचा सण साजरा होतो. हा सण शेतशिवाराला सकारात्मक ऊर्जा देणारा असतो. वर्षभर कष्ट केलेल्या अन् धान्यरूपाने सतत परतावा देणाऱ्या काळ्या आईची पूजा करण्याच्या या रानमहोत्सवाची सर्वांनाच ओढ लागते..Vel Amavasya : दर्शवेळा अमावास्या सणाच्या खरेदीची लगबग.कडब्याच्या कोपीत लक्ष्मीपूजनदर्शवेळा अमावास्येच्या दिवशी शेतीमध्ये कडब्याची कोपी करून त्या कोपीत लक्ष्मीपूजन केले जाते. यावर्षी चारावर्गीय पिकांची टंचाई असल्याने कडब्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. दुग्धोत्पादनात वाढ होऊनही चारावर्गीय पिकांच्या क्षेत्रात सतत घटच होत असल्याचे चित्र आहे. हिरव्या चाऱ्यासह कडबाटंचाईमुळे दर्शवेळा अमावास्येच्या दिवशी शेतशिवारात कोपी करण्यासाठीही कडबा उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांना उसाच्या वाड्याची कोप करावी लागणार आहे, तर बहुतेकांना कडबा विकत घेऊनच शेतीत कोप तयार करावी लागणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.