Dev Diwali 2026: यंदा देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, दीपप्रज्वलनाचा मुहूर्त आणि पौराणिक कथा

DEV DIWALI 2026 DATE AND AUSPICIOUS TIMINGS: कार्तिक पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या देव दिवाळीचा शुभ मुहूर्त, दीपदानाचे महत्त्व आणि त्रिपुरासुर वधाची पौराणिक कथा जाणून घ्या.
DEV DIWALI 2026: DATE, SHUBH MUHURAT & RELIGIOUS SIGNIFICANCE

DEV DIWALI 2026: DATE, SHUBH MUHURAT & RELIGIOUS SIGNIFICANCE

sakal

Updated on: 

KARTIK PURNIMA 2026 RELIGIOUS SIGNIFICANCE: दिवाळीचा सण संपल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी किंवा देव दीपावली साजरी केली जाते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवतांनी पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी केली होती, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी दीपदान, पूजाअर्चा आणि धार्मिक विधी करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.

देव दिवाळीच्या निमित्ताने घरातील देवघर, तुळशीवृंदावन, प्रवेशद्वार तसेच मंदिरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात. काशीमध्ये तर या उत्सवाचे भव्य स्वरूप पाहायला मिळते. यंदा देव दिवाळी कोणत्या दिवशी आहे आणि दिवे लावण्यासाठी कोणता वेळ शुभ आहे, जाणून घेऊया.

Loading content, please wait...