Dev Uthani Ekadashi 2022: आज एकादशीला 'या' वस्तूंचे दान करा; आयुष्यात होईल सुखाची भरभराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dev Uthani Ekadashi 2022

Dev Uthani Ekadashi 2022: आज एकादशीला 'या' वस्तूंचे दान करा; आयुष्यात होईल सुखाची भरभराट

Dev Uthani Ekadashi: देवउठणी एकादशीचा दिवस फार महत्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात याचे फार महत्व आहे. असे मानले जाते की देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू 4 महिने योगनिद्रात जातात तर देवउठनी एकादशीच्या दिवशी म्हणजे आज ते जागे होतात. या दिवशी निद्रेतून जागे होत ते पृथ्वीची जबाबदारी घेतात असे मानले जाते. त्यामुळे आज महत्वाची वस्तू दान केल्यास तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

देवउठणी एकादशीचे महत्व

हिंदू धर्मानुसार, या दिवसापासून सर्व शुभ कार्याला सुरूवात होते. देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहासारख्या शुभ कार्याला सुरूवात होते. त्यानंतर हिंदू धर्मीय जोडप्यांच्या लग्नांना सुरूवात होते. देवउठनी एकादशी दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. यंदा ही एकादशी ३ नोव्हेंबरला सुरू झाली असून आज म्हणजेच ४ नोव्हेबरला संध्याकाळी ६.०८ वाजता संपेल. उदयतिथीनुसार देवूथनी एकादशीचे व्रत ४ नोव्हेंबर म्हणजेच आज ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: Love Rashi Bhavishya : यंदाच्या दिवाळीत 'या' राशींच्या तरुणींचे होईल शुभ-मंगल

या एकादशीला काय दान करावे?

हिंदू धर्मात दान धर्माला फार महत्व आहे. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने भगवान विष्णूसह सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे या दिवशी घराचे आंगण शेणाने सारवतात आणि ते फार पवित्र मानले जाते. यादिवशी अन्न व पैशांव्यतिरिक्त धान्य, मका,गहू, बाजरी, गूळ, उडीद आणि कपडे दान केले जातात. रताळे आणि उस दान करणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी लाभते.