Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने का खरेदी करतात? काय आहे आख्यायिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanteras 2022

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने का खरेदी करतात? काय आहे आख्यायिका

पुणे : धनत्रयोदशीला धनतेरस देखील म्हणतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13 व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी करतात. पाच दिवसांच्या दिवाळीची या दिवशी सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीही असते. असे म्हटले जाते की, धनत्रयोदशी दिवशी सोने-चांदी खरेदी केली तर घरात समृद्धी येते. त्यामुळे अनेकजण या दिवशी सोने-चांदीची खरेदी करतात.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दरवाजात या 5 गोष्टी ठेवा आणि श्रीमंत व्हा

असे मानले जाते की धनत्रयोदशी ही अशी वेळ असते जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांच्या घरी जाऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करते. त्यामुळे लक्ष्मीचे रूप म्हणून सोने घरी आणतात. जाणून घेऊयात यामागील कथा आणि मुहूर्त.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' गोष्टी करा; घरात आपोआप लक्ष्मी नांदेल

यंदा या मुहूर्तावर करा खरेदी

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.02 वाजता सुरू होत आहे, तर रविवार, 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:44 वाजता त्रयोदशी तिथी समाप्त होईल. या मुहूर्तावर तूम्ही सोने खरेदी करू शकता.

हेही वाचा: Dhanteras 2020: जाणून घ्या धनत्रयोदशी दिवशी काय खरेदी करावे, काय नको?

का शुभ आहे धनत्रयोदशी

धनत्रयोदशी हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात. यावेळी भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणूनच हा दिवस सोने, चांदी आणि भांडी खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.

यानिमित्ताने सोन्यात न चुकता गुंतवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. भारतात सोने-चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीचा दिवस नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. सराफी कट्टा या दिवशी गजबजून जातो.

हेही वाचा: Dhanteras 2022: धनत्रयोदशीला यम देवतेच्या नावाने दिवा का लावतात,जाणून घ्या कारण

यामागील पारंपरिक कथा

एका पौराणिक कथेनूसार, हिमा राजाच्या नवविवाहीत पत्नीने सोन्याची मदत घेऊन त्याचे प्राण वाचवले होते. राजाचे प्राण न्यायला यम आल्यावर राणीने राजाला सोन्याच्या ढिगात लपवले. त्या सोन्याची उजाळी पाहुन यमाचेही डोळे दिपले आणि तो राजाला शोधू शकला नाही. तेव्हापासून सोन्याला महत्त्व प्राप्त झाले अशी आख्यायिका आहे.