Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दरवाजात या 5 गोष्टी ठेवा आणि श्रीमंत व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanteras 2020

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दरवाजात या 5 गोष्टी ठेवा आणि श्रीमंत व्हा

दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीची सण धनत्रयोदशीच्या दिवसापासून सुरू होतो आणि भाऊबिजेच्या दिवशी संपतो. दिवाळीला धनत्रयोदशी पहिल्याच दिवशी येते,त्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे.या दिवसापासूनच दिवाळीचा सणाची सुरुवात होते.म्हणूनच या दिवशी अनेक वास्तु उपाय करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये समृद्धी राहते.

हेही वाचा: Dhanteras 2022: धनत्रयोदशीला यम देवतेच्या नावाने दिवा का लावतात,जाणून घ्या कारण

अशाच उपायांपैकी एक म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा सजवणे.जी व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दरवाजावर काही खास वस्तू ठेवते, त्याच्या घरात सदैव समृद्धी राहते आणि धनाचा वर्षाव होतो. यावर्षी 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार असून या दिवशी जर तुम्ही घराचा मुख्य दरवाजा आम्ही सांगितलेल्या नियमांनुसार सजवला तर वर्षभर तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला ‘हे’ उपाय करा; नशीब होईल धन-धना-धन

लक्ष्मीची पाऊले

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पाऊले मुख्य दरवाजावर लावल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते.लक्ष्मीजीची पाऊले मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला बाहेरून आत येत आहेत अशा पद्धतीने लावा. धनत्रयोदशी हा मुख्यतः लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो. त्यामुळे ही पाऊले तुमच्या घरासाठी शुभ असतात.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' गोष्टी करा; घरात आपोआप लक्ष्मी नांदेल

प्रवेशद्वारावर स्वस्तिक बनवा

जर तुम्हाला घरामध्ये समृद्धी हवी असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दारावर स्वस्तिकचे चिन्ह लावा. हिंदू धर्मात हे चिन्ह लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि धनत्रयोदशीच्या दिवशी हे चिन्ह मुख्य दरवाजावर लावल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.

हेही वाचा: Diwali 2022 : यंदा दिवाळीत बिना रिझर्वेशन करू शकतात प्रवास, IRCTC ने केले जाहिर

मुख्य दरवाजावर तोरण लावा

धनत्रयोदशीच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा नीट स्वच्छ करून त्यावर फुलांचे तोरण बांधावे . तोरणासाठी तुम्ही आंबा आणि अशोकाची पाने वापरत असाल तर ते तुमच्यासाठी फलदायी असतील.आंब्याची पाने देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. त्याचा वापर केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते.

हेही वाचा: Dhanteras 2020 pooja Time : जाणून घ्या, तुमच्या शहरातील धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त

मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा

धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दरवाजात तुपाचा दिवा लावावा. हा दिवा दरवाजाच्या उजव्या बाजूला जेथे उजेड घरात प्रवेश करण्यास अडथळा होणार नाही अशा ठिकाणी ठेवा . प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश करताना तो पहावा आणि घराच्या समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी.

हेही वाचा: Diwali Rangoli 2022 : तुम्हाला माहितीये, रांगोळीची परंपरा हडप्पा संस्कृतीपासून!

तुळशीचे रोप

तुळशीचे रोप देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर तुळशीचे रोप ठेवा. परंतु तुळशीचे रोप रात्रभर घराबाहेर ठेवू नका. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या दिवशी तुळशीजवळ दिवाही ठेवावा.