Dhanteras 2022 धनतेरसच्या मुहूर्तावर राशीनुसार या वस्तूंची करा खरेदी; नशीब होईल धन-धना-धन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanteras 2022

आजच्या दिवशी धणे, झाडू, भांडी, सोने-चांदी आणि मालमत्तेची खरेदी अत्यंत शुभ मानली जाते

Dhanteras 2022 : धनतेरसच्या मुहूर्तावर राशीनुसार या वस्तूंची करा खरेदी; नशीब होईल धन-धना-धन!

पूणे : आज दिवाळीताल शुभ मानली जाणारी धनत्रयोदशी आहे. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. आजच्या दिवशी धणे, झाडू, भांडी, सोने-चांदी आणि मालमत्तेची खरेदी अत्यंत शुभ मानली जाते. शास्त्रात धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खरेदी केलेली चांदी अनेक पटीने वाढते. चांदी, खरेदी करण्याची परीस्थिती नसल्यास तांबे किंवा इतर धातू खरेदी करावी असेही शास्त्रात सांगितले आहे.

हेही वाचा: Dhanteras 2022 : आयुर्वेदाचे जनक धन्वंतरीच्या पूजेचे काय आहे वैज्ञानिक कारण? जाणून घ्या

शास्त्रानुसार, दिवाळीच्या दोन दिवस आधी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता. जेव्हा भगवान धन्वंतरीचा अवतार झाला तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. या दिवशी जे काही खरेदी केले जाईल ते वाढत जाते असा समज आहे.

हेही वाचा: Dhanteras Puja 2022 : आरोग्य अन् समृद्धीसाठी करावी धनत्रयोदशी पुजा; जाणून घ्या मंत्रांसह संपुर्ण विधी

शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी काही नियमही सुचवले गेले आहेत. आजच्या दिवशी राशीनुसार खरेदी केल्याने अधिक फायदा होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार काय खरेदी केल्यास फायदा होईल हे पाहुयात.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने का खरेदी करतात? काय आहे आख्यायिका

मेष - मेष राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला सोने किंवा पितळेच्या वस्तू खरेदी कराव्यात. तुम्ही सोन्याची छोटी वस्तू, किंवा सोन्याचे नाणे खरेदी करू शकता. जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर तुम्ही पितळेची एखादी वस्तू किंवा पितळेची भांडी खरेदी करू शकता.

वृषभ – ज्या लोकांना वाहन खरेदी करायचे आहे आणि ते वृषभ राशीचे आहेत. अशा लोकांनी आजच्या दिवशीच्या मुहूर्ताचे सोने करावे. जर तूम्हाला वाहन खरेदी करायची नसे तक तुम्ही कपाट किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू शकता.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दरवाजात या 5 गोष्टी ठेवा आणि श्रीमंत व्हा

मिथुन - धनत्रयोदशीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी पितळेची भांडी खरेदी केल्यास चांगला लाभ होईल. तुम्ही पितळेची देवाची मूर्तीही विकत घेऊन आणू शकता.

कर्क - कर्क राशीचे लोक भावनिक असतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना नुकसानही होते. त्यामुळे स्वभावात असलेली भावनिकता सुधारण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी पितळ किंवा सोन्याच्या वस्तू खरेदी करणे शुभ राहील.

सिंह - सिंह राशीच्या ज्या लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत. त्यांनी चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी आज तांब्याचे भांडे खरेदी करावे. आज तांब्याचा कप, ग्लास किंवा जग खरेदी करू शकता.

हेही वाचा: Dhanteras 2020: जाणून घ्या धनत्रयोदशी दिवशी काय खरेदी करावे, काय नको?

कन्या - कन्या राशीचे लोक धनत्रयोदशीला कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करू शकतात. मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक बाईक असे काहीही खरेदी केल्यास लाभदायक ठरेल.

तूळ - तूळ राशीचे लोक धनत्रयोदशीला पितळेची मूर्ती खरेदी करून आणू शकतात. पण शो पिस नव्हे तर एखाद्या देवाची पितळेची मूर्ती असावी. मूर्ती घेणे शक्य नसेल तर एखादे पितळेचे भांडे खरेदी करावे.

वृश्चिक - या धनत्रयोदशीला वृश्चिक राशीच्या लोकांनी चांदीचे नाणे खरेदी केले तर त्यांचे नशीबात भरभराट होईल. आज चांदीची कोणतीही भांडी खरेदी करू शकता.

हेही वाचा: Dhanteras Puja: कर्जमुक्त व्हायचंय? धनत्रयोदशीच्या दिवशी 'हे' उपाय करा

धनु – आजच्या दिवशी या राशीच्या लोकांनी तांब्याचा दिवा खरेदी करावे असे केल्यास लाभ होईल. याशिवाय तुम्ही तांब्याची भांडे खरेदी करू शकता.

मकर – या दिवशी मकर राशीचे लोक पितळेची मूर्ती किंवा कोणतीही भांडी घरी आणू शकतात. या वस्तूंची खरेदी खूप शुभ राहील. पण या वस्तू दिवाळीनंतरच वापरल्या तर बरे होईल.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य दरवाजात या 5 गोष्टी ठेवा आणि श्रीमंत व्हा

कुंभ- कुंभ राशीचे लोक धनत्रयोदशीच्या संध्याकाळी चांदीची भांडी खरेदी करून घरी आणतील. तुम्ही चांदीचा तांब्या, ग्लास किंवा जग आणू शकता. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतील.

मीन - मीन राशीच्या लोकांनी तांब्याचे भांडे खरेदी करणे चांगले राहील. हे पात्रही पाण्याचे असावे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा.