Dhanteras 2022 : धनत्रयोदशीचं नेमकं धन कोणतं? समजून घ्या काळानुरूप अर्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanteras 2022

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीचं नेमकं धन कोणतं? समजून घ्या काळानुरूप अर्थ

Dhanteras meaning : धनत्रयोदशीला धनाची पूजा करावयाची असते. उत्तम धनप्राप्ती व्हावी, सुख मिळावे हा त्यामागचा हेतू असतो. या आधुनिक काळात केवळ पैसा म्हणजे धन असे राहिलेले नाही. शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य आणि बौद्धिकस्वास्थ्य हेच धन सुखप्राप्तीसाठी अतिशय आवश्यक झाले आहे. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी त्या धनाबरोबरच शरीरस्वास्थ्य, मन:स्वास्थ्य आणि बौद्धिकस्वास्थ्यासाठीही प्रार्थना करूया.

धन म्हणजे नेमके काय असते ते समजून घेऊया.

धन कशासाठी?

वेगवेगळ्या विद्वानानी ‘धन’ या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे. जीवनातील बहुतेक सर्व व्यवहार ज्या द्रव्यावर अवलंबून असतात त्याला धन असे म्हणतात. धन हेच सर्व कार्याच्या मुळाशी असते असे नारदस्मृतीत म्हटले आहे. प्राचीन काळापासून सुवर्ण हे धनाचे प्रतीक मानले गेले आहे.

हेही वाचा: Dhanteras 2022 : आयुर्वेदाचे जनक धन्वंतरीच्या पूजेचे काय आहे वैज्ञानिक कारण? जाणून घ्या

आधुनिक काळातला अर्थ

मागील दोन वर्षांच्या कोरोना संकटात आपल्याला अनेक गोष्टींचे महत्त्व समजले आहे. तुम्हाला ती घटना आठवत असेल. न्यूयॅार्क शहरात एक माणूस डॅालर्स रस्त्यात फेकत चालला होता. सर्व लोकांना आश्चर्य वाटत होते. काही लोक तर त्याला वेडाच समजले. पण तो वेडा नव्हता ! तोच शहाणा होता.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला 'या' ठिकाणी लावा पणती, लक्ष्मी देवीचा लाभेल आशीर्वाद

लोकांनी त्याला “ डॅालर्स का फेकतोस ? “ असे विचारले. तो म्हणाला, “ डॅालर्स भरलेली ही बॅग माझ्या मित्राने त्याच्या मृत्यू समयी मला दिली. या बॅगेतील डॅालर्स रस्त्यात फेकून द्यायला सांगितले. कारण माझा हा मित्र खूप श्रीमंत होता. कोरोनाने तो खूप आजारी झाला. पैसे मिळविण्याच्या नादात त्याने तब्बेतीकडे दुर्लक्ष केले. डॅालर्सच्या धनापेक्षा आरोग्यधन खूप महत्वाचे आहे. हे डॅालर्सचे धन तू फेकून दे. “ ही घटना बरेच काही सांगून जाते.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त आणि शुभ योग कोणता आहे?

आपण समाजात पाहतो. भ्रष्टाचार , लबाडी, अनीतीने वागून धनप्राप्ती झाली. पण नंतर तुरुंगात जावे लागले. काय त्या धनाचा उपयोग ? धन मिळाले पण सुख- समाधान - आनंद ? काही लोक पाहतो , त्यांच्याकडे धन आहे पण सतत आजारी ! काहींच्यापाशी धन आहे पण मन: स्वास्थ्य नाही. सतत चिंता करीत जगतात.

टॅग्स :Diwali FestivalDiwali