Diwali 2022 : पुराणातील या उल्लेखामुळे घुबड बनले लक्ष्मीचे वाहन, जाणून घ्या वैशिष्टे अन् महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali 2022

Diwali 2022 : पुराणातील या उल्लेखामुळे घुबड बनले लक्ष्मीचे वाहन, जाणून घ्या वैशिष्टे अन् महत्त्व

Diwali 2022 : लक्ष्मीचे वाहन घुबड हे विशिष्ट आणि सांकेतिक दृष्टिकोनाचे प्रतीक मानले जाते. असं म्हटल 'जात घुबड जे पाहू शकत ते जग पाहू शकत नाही'. जेव्हा सार जग निद्रेत असत तेव्हा घुबड जागा असतो आणि आपले काम करत असतो. याच उत्कीप्रमाणे सतत कार्य करण्याच्या या विलक्षणतेमुळे घुबडामध्ये व्यापारी क्षमता आहे. म्हणूनच घुबड हा धनाचा वाहक आहे, जो वेळेआधी येणाऱ्या घटना पाहात असतो. मात्र घुबडाचे लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजन करणे उचित मानले जात नाही. तरीही घुबडाचे पुराणात विशेष महत्त्व आहे. चला तर घुबडाचे पुराणातील महत्त्व अन् घुबड देवीचे वाहन का मानले जाते ते जाणून घेऊया.

(Diwali 2022 Significance in veda Purana Dharm Shastra importance about Owl is Lakshmi's vehicle)

हेही वाचा: Diwali 2022 : लक्ष्मीपूजनाला तुळजा भवानीला दाखवतात मांसाहाराचा नैवेद्य, जाणून घ्या कारण

संकट काळापूर्वीच होते घुबडाला संकटांची जाणिव

घुबडाला कुठल्याही संकटांबद्दल संकट काळापूर्वीच जाणिव होऊन जाते. यामुळेच घुबडाला अपशकुनाचा प्रतीक मानले जाते. मात्र असे असले तरी घुबडामध्ये असलेली एक अद्भुत क्षमता त्याला खास बनवते. ती म्हणजे घुबड आपली मान 170 अंशापर्यंत फिरवू शकतो. घुबड आपले लक्ष साधताना इतक्या सतर्कतेने हालचाल करतो कि उडताना त्याच्या पंखांचासुद्धा आवाज होत नाही. ना त्याच्या डोळ्यांच्या पापण्या लवतात.

हेही वाचा: Diwali 2022: या मंदिरात भक्त चिट्ठ्या लिहून मागणं घालतात, लक्ष्मी माता करते सर्व इच्छा पूर्ण

पाश्चात्य संस्कृतीत घुबडाला विशेष महत्त्व

पाश्चात्य संस्कृतीमध्ये घुबडाला विवेकशील मानले जाते. चिनी लोक घुबडाला सौभाग्य अन् सुरक्षेचा प्रतीक मानतात. जपानमध्ये याला संकटमोचक मानले जाते. प्राचीन ग्रीक लोक घुबडाला सौभाग्य आणि धन संपन्नतेसाठी कारक मानत. युरोपमध्ये घुबडाला जादु- टोण्यापासून सुरक्षा आणि तथा त्यात गुंतण्यासाठी प्रसिद्ध मानत. भारतातही घुबडाशी संबंधीत उलूक तंत्र अत्यंत प्राचिन आहे.

Owl

Owl

हेही वाचा: Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका नाहीतर होईल लक्ष्मी मातेचा कोप

पुराणातील या उल्लेखांमुळे घुबड लक्ष्मीचे वाहन

वाल्मिकी रामायणात घुबडाचा उल्लेख आहे. प्रभु श्रीराम जेव्हा रावणाला पराजित करण्यासाठी संघर्ष करत होते. तेव्हा सुग्रीवाने श्रीरामाला रावणाच्या उलूक (घुबड) चतुराईपासून सावध राहण्याचे संकेत दिले होते.

लिंग पुराणात असे लिहीले आहे कि, नारदमुनींनी मानसरोवरस्थित घुबडाकडून संगिताचे ज्ञान प्राप्त केले होते. घुबडाचा हू हू हू स्वर संगिताच्या विशिष्ट स्वरांना प्रतिबिंबीत करतो. तंत्र शास्त्राच्या धारणांनुसार जेव्हा लक्ष्मी पाताळ, एकांत, दुर्गम किंवा अत्यंत अंधाऱ्या ठिकाणी जाते त्यावेळेस देवी लक्ष्मी घुबडावर स्वार होते. केवळ याठिकाणी जाताना घुबडावर लक्ष्मी स्वार होते आणि म्हणूनच घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. देवी लक्ष्मीचे वाहन मानल जाणार घुबड अप्रत्यक्ष धनाचा प्रतीक देखील मानला जातो.

हेही वाचा: Diwali 2022: यंदा दिवाळीच्या पणत्या लावताना 'या' गोष्टींची काळजी घ्यावी?