अनेक वर्षांनंतर दिवाळीत शुक्रादित्य-बुधादित्य योग! 'या' ४ राशींचे नशीब चमकेल; नोकरी-व्यवसायात मिळणार घवघवीत यश...

Diwali 2026 Horoscope: अनेक वर्षांनंतर जुळून आला दुर्मिळ राजयोग; यंदाच्या दिवाळीत ग्रहांच्या दुर्लभ संयोगामुळे मेषसह चार राशीच्या जातकांना होईल अफाट धनलाभ! वाचा सविस्तर राशीभविष्य...
Diwali 2026 Horoscope Rare Rajyoga Benefits 4 Zodiac Signs

Diwali 2026 Horoscope: Rare Rajyoga Benefits 4 Zodiac Signs

esakal 

Updated on: 

Diwali 2026 Lucky Zodiac Signs: दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला प्रकाश उत्सव म्हणजेच 'दिवाळी'चा सण उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे, यंदाची दिवाळी ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत खास असणार आहे, कारण अनेक वर्षांनंतर ८ नोव्हेंबर या दिवशी अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. या पवित्र पर्वावर स्वाति नक्षत्र, आयुष्मान आणि सौभाग्य योगासोबतच तूळ राशीमध्ये सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे 'शुक्रादित्य योग' तसेच सूर्य व बुध यांच्या युतीमुळे 'बुधादित्य योग' निर्माण होत आहे.

ग्रहांच्या या शुभ संयोगाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार असला, तरी ४ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. या विशेष योगामुळे संबंधित जातकांना करिअरमध्ये मोठी भरभराट, नोकरीत बढती, व्यवसायात प्रचंड फायदा आणि धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. दिवाळीच्या या मंगलमयी पर्वावर कोणत्या चार राशींचे भाग्य उजळणार आहे, याचे सविस्तर भविष्य पाहूया-

Loading content, please wait...